रविवार, ५ डिसेंबर, २०२१

World soil day

   
Keep soil alive 
Protect soil biodiversity

    आजच्या जागतिक मुदा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। 



आज जागतिक माती दिन !

माती (मृदा) हा अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करण्यासाठी ५ डिसेंबर हा ‘जागतिक मृदा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
                                                                                                                                                                            आज  आपण माती शिवाय काहीच उत्पादित करू शकत नाही .आज जगात खूप शोध लागले मात्र मातीला पर्याय  अजून सापडला नाहीय .आजही कुठले हि पिक उत्पादन  घेण्य साठी माती आवश्यक आहे .आज साधारण आपल्या भागात जमीन हि मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणारी जमीन हि प्रत्येक पिकासाठी आवश्यक आहे .आणि त्या जमिनीचा सामू हा जवळ जवळ जमिनीचा सामू हा ६.५ ते ८ असावा सामू ६ पेक्षा कमी असणार्या जमिनीत पिके हि यात नाहीत ,आज भारतातील जमिनी ह्या हवामान प्रजन्य मन  भोगोलिक परिस्थिती नुसर जमिनी ह्या काळी किवा तांबडी  आढळते . 

जमिनीचे कार्य -;
 १ जमिनीतील सुक्षम जीवांचे संगोपन करणे .
२ पिकांना आवश्यक तेवढा ओलावा निर्माण करून देणे .
३ जमिनीतील अन्नद्रव्यांचे उपयोग पिकांच्या वाढीसाठी व अन्न निर्यातीसाठी करणे .
 ४ मातीतील खनिजे  उपलब्ध करून देणे .

मातीचे महत्व ,
                    मातीचे महत्व खूप आहे .आज आपल्याला माहिती आहे कि विज्ञानामुळे खूप शोध लागले पण मातीला पर्याय नाही मिळाला .म्हणून आज  मातीच्या  एक एक कनाला  महत्व आहे .मातीचा एक कण निर्माण होण्याला हजारो वर्षे लागतात मात्र तोच एक मातीचा कण आपण खूप सहज  नष्ट करत आहे .जमीनीच प्रदूषण करून  .आज आपण मातीत खूप घटक मिसळून  मातीला नापीक प्रदूषित केल आहे .आज जमिनी ह्या क्षार युक्त आणि चोपण झाल्या आहेत मानवाच्या चुका मुळे मानवाने अति उत्पादन घेण्याच्या नादात आज जमिनी ह्या चोपण आणि क्षार युक्त केल्या आहेत .खाते, कीडनाशक  ,तन नाशके ,  अति सिंचन यामुळे जमिनी  जमिनी नापिकी झाल्या आहेत .                                                                                                                                                                         माती संवर्धन  मोहीम ,
                                आज आपल्या सर्वांना गरज आहे ती माती संवर्धन करण्याची मातीचे महत्व सर्वाना नाहीत करून देण्याची .मातीला  सुपीक आणि  उपयोगी बनवण्याची  त्यासाठी आपल्याला मातीला प्रदूषित करणाऱ्या  रासायनिक घटकाच्या  वापरावर बंदी आणून मातीला सुपीक उपयोगी बनवण्य साठी प्रयत्न करण्याची .शेतकरी  यांना     रासायनिक खतला , कीडनाशक , तपनाशक ला पर्यायी  सेंद्रिय  घटक उपलब्ध  करून देणे .           
   
सेंद्रिय शेती ,
                 आज आपण पाहत आहोत कि रासायनिक शेतीतून काय दुषपरिनाम होत आहेत .त्याला  पर्यायी म्हून आज सर्वांनी सेंद्रिय शेती  करणे  फायद्याचे आहे .ते खूप महत्वाचे असून काळाची गरज  आहे .शेंद्रीय पद्धतीने शेती केल्याने मातीचे  संगोपन आणि संवर्धन चांगल्या पद्धतीने होते हे शिध झाले आहे .


      माती हि आजची जननी आहे ,जी असंख्य जीवाला अन्न पाणी पुरवत आहे ,त्यामुळे मातीला वाचवणे गरज नसून आपले कर्तव आहे ,धरणी ला आपण माता मानत आलो आहे ,आज गरज आहे आपण तिला आपल्या आई सारख साभाळ करण्याची .चला तर मग काळजी घेऊ ..

सोमवार, १२ जुलै, २०२१

World paper bag day ..

 World paper bag day 2021 जागतीक कागदी पिशवी दिवस !

प्लास्टिक मुळे होणारे प्रदुषण आणि त्या मुळे नैसर्गिक पर्यावरण यांच्या वर होणारे परिणाम यांचा बद्दल मानव जातीला जागरूक करण्यासाठी जगामध्ये प्रतिवर्षी १२जुलै हा दिवस  जागतिक पातळीवर World paper bag day ! म्हणून साजरा करतात.

प्लास्टिक कचरा नष्ट होण्याला सडाला .हजारो वर्ष लागतात . त्यामुळे सिंगल युज प्लास्टिक बागेमुळे होणारे दुष्परिणाम आपल्याला माहीत असायलाच पाहिजेत.
प्लास्टिक कचरा मुळे होणारे प्रदुषण आणि परिणाम आपल्याला माहीत असायलाच हवे.
* जल
*जमिन
*वायु
*तापमान
*प्राणी पक्षी वनस्पती आणि किटक
*मनुष्य 
*रासायनिक दुष्परिणाम
प्लास्टिक चार वापर म्हणजे भावी पिढी साठी गळफास लावून ठेवणे होय जो त्या वापर करून आपण स्वतः आवळत चालला आहे.

पर्यावरण आणि मानव व सर्व सजीव सृष्टी चया आरोग्य स  हाणिकार ठरलेल्या प्लास्टिक चार वापर  आजही धुमधडाक्यात व खुलेआम सुरू आहे त्या चे ना प्रशासनाला ना नागरिकांना भान हरपून गेले आहे.
कायदा करून ३५ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि तरि पण् कोणालाही काही गैर वाटत नाही  १९८६ ते आज पर्यंत ४  वेळी कायदा करून दिला आहे  ४० मायकौन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वर बंदी घातली आहे ( स्वच्छ भारत'  अभिमान ) स्वच्छ शहर, गाव. स्पर्धा हे कशासाठी करतेय शासन हे अजून ही आपल्या लक्षात येते ना हीय .
प्लास्टिक जप्त करण्यात आल्या मोहीम राबविण्यात आल्या होत्या त्या वेगाने त्या थांब वली जाते राजकारण केले जात आहे थट्टा करून दिला आहे त्या मुळे नैसर्गिक पर्यावरण यांच्या इतर अनेक परिणाम होतो हे अजून ही आपल्या लक्षात येत नाही  
आज भाजी विक्रेते फळ वाला. किराणा दुकान, होटेल , मटणाचे दुकान खाद्यपदार्थ औषधे आदी . सर्व च  ठिकाणी पातळ व कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापर सर्रास सुरू आहे याच प्लास्टिक पिशव्या मधुन टाकाऊ  अन्न वा वस्तू लोक फेकून दिले जाते. रस्ते मोकळे जागा मैदानावर सावजणीक ठिकाणी बस स्थानक परिसरात बाग मंदिर शाळा दवाखाने रुग्णालये परीसरात तलाव नद्या नाले ओढे पार या ठिकाणी तर लोकांच्या निष्काळजीपणा कळस गाठला आहे  म्हणून आपण जागतिक पातळीवर स्वच्छता यादी मध्ये १३१ नंबर आहे . आपल्या कडे लोकांच्या निष्काळजीपणा रोज गाडंन मैदानावर येणारे लोकं हे सर्रास जागेवर च प्लास्टिक कचरा पिशवी बाटली शिवा सोडून निघून जातात . त्या ठिकाणी कचरा कुंडी असताना त्यात कोणीही टाकत नाही . खरं तर ही सवय आहे स्वच्छ हातांची,स्वच्छ मनाची माणुसकी म्हणजे भावी पिढी काय शिकावे ?  
रस्ता वरही हीच परिस्थिती लोकांच्या निष्काळजीपणा रोज सकाळी ओळख करून देतात . त्या चा परीणाम मानवी जीवन आरोग्य तसेच प्राणी पक्षी वनस्पती किटक  यांवर गंभीर परिणाम होतो यात त्या चे जिवीत हानी होते.
इतर् फेकले प्लास्टिक पिशव्या गाय,म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या कोंबड्या व इतर अनेक प्राणी पक्षी त्या खात्यांत . प्लास्टिक पिशव्या मधील वस्तू नष्ट होतात.पण प्लास्टिक नष्ट होत नाही. त्यामुळे हेच प्लास्टिक  प्राणी पक्षी कीटक पोटात अडकून राहते. त्यामुळे यांचा जिवन धोका निर्माण होऊ शकतो. असे अनेकदा घशात अथवा सवशन नलीकेत अडकुन प्राणी  मुत होतो . जमिनीत अथवा पाण्यात असले तरी प्लास्टिक पिशव्या नष्ट होत नाही. प्लास्टिक जाळले तर हवे चे प्रदुषण होते. प्लास्टिक मद्ये विविध घातक रसायने असतात.  ते मानवाच्या कातडीला ते धोकादायक ठरू शकते. जमिन नापिकी बनतात . पाण्यात ही रासायनिक घटक वाढत आहे. केंद्रीय सरकार ने ३५  वर्ष  पुवि पर्यावरण संरक्षणासाठी अधिनियम १९८६ व महाराष्ट्र शासन प्रदुषण महामंडळ स्थापन केले व त्या अन्वये शासनाने ४० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वस्तू सर्व प्रकारच्या प्लास्टिक वर बंदी घातली आहे तरी त्याची निर्मिती व विक्री धडाक्यात सुरू आहे.केवळ महाराष्ट्र राज्य नव्हे तर केरळ पासून ते कश्मीर पर्यंत हेच सुरू आहे.आज गरज आहे ती आपण सर्व मिळून प्लास्टिक कचरा पिशवी बाटली चा वापर कमी करायची . त्यासाठी आपण स्वतः मनापासून प्रयत्न केले पाहिजेत.आज काही सुज्ञ नागरिक कृती करित आहे.मि प्लास्टिक पिशव्या वापर करणार नाही अशी भूमिका घेतली पाहिजे. प्लास्टिक पिशव्या घेऊ नका देऊ नका. प्लास्टिक ला पर्याय उपलब्ध आहेत. त्या चा वापर करून आपण प्लास्टिक चा वापर कमी करू शकतो. 

त्यामुळे आपण शपथ घेऊन
!एकच ध्यास ठेवूया, प्लास्टिक पिशव्या हटवुया.
        समूधद पर्यावरण रक्षण करुया.!!

आजच्या दिवसाची शुरुवात व इतिहास...
सन.१८५२मधे अमेरिकेत शास्त्रज्ञ फ्रान्सिस व्हाले  यांनी पेपर पासून पिशवी बनवण्याची पद्धत मशिन बनविली .होती तसेच the mother of the glossary bags म्हणून ओळखली जाणारी मार्गारेट इ नाईट यांनी किराणा मालाच्या पिशवी चा आविष्कार केला होता. तेव्हा त्यांनी paper bag चा प्रचार व प्रसार केला तेव्हा पासून सर्व जगात १२  जुलै  हा दिवस जागतिक पातळीवर" World paper bag day "म्हणून साजरा करतात.
 
Paper bag uses..
#Paper bag हि पुर्ण पणे लाकडाच्या पासून पिशवी बनवण्यात आली असल्याने पर्यावरणासाठी अनुकूल आहे.
#paper bag बयोडिगेडेबल (जैविक घटकांनी बनलेली ) असल्याने विषारी पदार्थ तयार करता नाही 
#paper bag चा पुन्हा पुन्हा वापरता येते तसेच या पासून कंपोस्ट खत तयार होते
#ईधन म्हणून ही वापर केला जातो आहे.

Paper bag disadvantages.....
#paper bag हा घटक लाकडाच्या पासून बनविला जातो.. त्यामुळे लाखो झाडे कत्तल करण्यात येत आहे.
# द्रव्य मान ,थंड ,जड पदार्थ  साठी वापर करण कठीण आहे..
प्लास्टिक आणि थमाकौल  वापर विक्री करतात आढळून 
आल्यास होणारे शिक्षा व दंड

प्रथम गुन्हा केल्यास---५००० दंड
दुसऱ्या दा गुन्हा-------+१०००० दंड
तिसऱ्या दा गुन्हा केल्यास --२५००० दंड आणि ३महिने कारागृहात रवानगी करण्यात येत
      
                " Save earth save life "

Featured post

चिकुनगुनियामुळे होणारी गंभीर लक्षणे ,

  चिकनगुनिया हा आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील डासांद्वारे मानवांमध्ये पसरणारा रोग आहे; इतर क्षेत्रांमध्ये तुरळक उद्रेक नोंदवले गेले आहेत. डे...