सोमवार, ४ जुलै, २०२२

झाडे त्यांची उपयुक्तता

Mango tree

नमस्कार ,

                             आज आपण या पेज वर आपल्या गावात परिसरात असलेलेया झाडण बदल त्यांच्या उपयुक्ते बदल या ब्लोग मध्ये माहिती करून घेणार आहोत 


आपले गाव ,गावाचे वातावरण ,तिथले पर्जन्यमान ,आपला उदेश आणि आपली गरज ओळखून झाडे लावली तर त्यांची उपयुक्तता आणखी वाढेल .त्यानुसार आपण  कोणती कोठे झाडे लावावीत ते पाहूया ..

#प्रदूषण नियंत्रणासाठी म्हणजे वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण वाढवण्यासाठी लावायची झाडे .--पिंपळ, अमलतास ,सेलम ,कदंब,गुलमोहर ,बाम्बुसा,वल्ग्यारीस.तुळस वड.

#वातावरणातील प्रदूषित कण शोषून घेणारी झाडे .--उंबर ,पळस ,सीताफळ ,जांभूळ ,सप्तपर्णी ,आवळा ,चिंच ,मोह ,बेल ,कडूनिंब ,पुंत्र्जीवा ,तेंदू ,आंबा ,चारोळी,अमलतास ,जारूळ, लेन्दिया ,अशोक ,सेनल ,गुग्गळ..

वातावरणात सुगंध पसरून हवेतील प्रदूषण थांबण्यासाठी .---बेल,अमलतास ,लेमनग्रास ,बांबू ,सफेद कचनार ..

#सांडपाण्याच्या जागेत लावायची झाडे --चिंच ,बोर ,कार्दाडी ,जांभूळ ,साजड,अर्जुन ..

#शोभेसाठी  लावायची झाडे .--यामध्ये गुलमोहर,पळस ,कदंब ,कांचन ,अमलतास ,कॅशीया ,प्रजाती ,ज्याक्रांडा,नागचाफा ,सोनचाफा ,शंकासूर ,जारूळ,पेत्रोफोरम ,गलीरीसिडीया ,सेमल ,बॉटल ब्रश ,रेन ट्री,बकाण ,केशिया प्रजाती ,सिल्वर ओक ,सुरु ,निलगिरी ,अशोक ,चंदन ,महोगनी ,बदाम ,जंगली बदाम 

#गवताच्या प्रजाती --शेडा,मोठा ,मारवेल ,मुशी ,डोंगरी ,बेर ,धामणा ,ऱ्होडस ,हराळी,काळी ,कुसळी ,फुली ,फोकळ्या,फोराडी, परा ,घाण्या मारवेल ,

#शेताच्या बांधावर लावायची झाडे .--१कुंपणासाठी -एरंड ,मेंधी चिल्लर ,विलायती बाभूळ ,ग्लीरीसिडीया ..

 #धार्मिक स्थळाजवळ लावायची झाडे .--उंबर ,वड बेल  ,अर्जुन ,आंबा .आवळा ,कदंब ,कवठ ,कांचन ,कवठीचाफा ,पारिजात ,बकुळ ,बेल ,रुद्राक्ष ,सोनचाफा ,चंदन ,चिंच ,नारळ ,पांढरा चाफा ..

#गावाच्या रस्त्याच्या कडेला लावायची झाडे -गावात येणाऱ्या रस्त्याच्या दु तर्फा असलेल्या शेतांच्या बांधावर वड ,चिंच ,शिसू ,कडुलिंब ,आंबा ,निलगिरी ,करंज ,गुलमोहर ,बाभूळ ,अमलतास ,जांभूळ .हि झाडे रस्त्याने लावावीत त्यामुळे रस्त्याने सावली प्रदूषण  उष्णता ,ओक्शिजेन ,हिरवळ असे बरच फायदे आपल्याला रस्त्याने झाडे लावली  तर मिळतील.    कारण हि झाडे  प्रतिकूल परिस्थितीत वाढतात ,त्यामुळे आपण हि झाडे मिळेल तेथे लाऊ शकतो...


झाडे लावू  झाडे जगवू ! जीवन सफल सुखी बनवू !





वड


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Ok

Featured post

चिकुनगुनियामुळे होणारी गंभीर लक्षणे ,

  चिकनगुनिया हा आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील डासांद्वारे मानवांमध्ये पसरणारा रोग आहे; इतर क्षेत्रांमध्ये तुरळक उद्रेक नोंदवले गेले आहेत. डे...