रविवार, १० जुलै, २०२२

वायू प्रदूषण

 वायू  प्रदूषण 

आजच्या घडीला सर्वात जास्त त्रास होत असलेल प्रदूषण म्हणजे वायू प्रदूषण .आज आपण भारताच्या सर्वात मोठ्या शहराची आज काय अवस्था झाली आपल्याला सांगायची गरज नाहीय .दिल्ही , मुंबई ,कोलकाता ,मद्रास , गुड गाव ,या शहरातील आज हवा कशी आहे .आणि तेथील लोक कसे सहन करतात हे आपल्याला माहित आहे .                                                                                             वायू प्रदूषण हे आज सर्वात जास्त जर होत असेल तर ते वाहणा मुळे आणि औधोगिक करणातून निघणार्या धुरा मुळे होते .तसेच ग्रामीण भागात गोवर्या /सेणी लाकूड आणि कचरा यांचा इंधन म्हणून वापर केला जातो .आजही भारतातील ग्रामीण भागात सुमारे दहा कोटी लोक रोजच अशा प्रकारचे इंधन चुली मध्ये वापरतात असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे .वायू प्रदूषणाचे हे एक प्रमुख कारण आहे .यामुळे कोळशाच्या पाच पट अधिक धूर या पासून निर्माण होतो .                                                                                                                          या शिवाय वाहनामधून निघणारा धूर आणि कारखान्यातून बाहेर पडणारा धूर यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते .उर्जेसाठी मोठ्या प्रमाणात  लाकूड ,शेतातील टाकाऊ कचरा वापरणारा भारत हा जगातील सर्वाधिक मोठा देश आहे .आजही अक्टोबर ते डिसेंबर या काळात वायव्य भारत आणि उतरं भारत येथे मोठ्या प्रमाणात पिके जाळली जातात .त्याचाच परिणाम आज दिल्ही गुडगाव  भोगत आहेत ,आज दिल्ही  मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण कमी करण्यावर पैसे खर्च करत आहे , आजही  त्या भागात उघड्यावर सुमारे ५० कोटीटन एवढा कचरा जाळला जातो .त्यातूनच पंजाब ,दिल्ही आणि पश्चिम बंगाल मधील नद्या च्या काठावर मोठ्या प्रमाणात धुके धूर आणि प्रदूषण युक्त हवेचा थर निर्माण झालेचे आढळते .                                                                             शहरी भागात वाहने आणि कारखाने हीच प्रदूषणाची महत्वाची कारणे आहेत .प्रदूषणामुळे आजही भारतात तीन लाख लोक अकाली मुत्यु मुखी पडत आहेत .जगातील सर्वात प्रदूषण युक्त शहरामध्ये भारताची ५ शहरे येतात . आणि जगातील दह देशामध्ये भारताचा क्रमांक लागतो .आज भारतात शहरीकरण आणि औधोगीकरण यांमुळे भारताच्या हवामानाचा दर्जा ढासळला आहे .                                                                                                                                                                 जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार गुडगाव दिल्ही हे सर्वाधिक प्रदूषण युक्त दहा शहरातील एक शहर आहे .वायू प्रदूषणाने आज दिल्ही तील  स्वशन आणि त्वचा विकार वाढला आहे .दिल्हीत स्मॉग मुळे श्वासण  विकाराचे रुग्ण खूप वाढले आहेत .त्यामुळे तेथील सरकारला वेळोवेळी उपाययोजना कराव्या लागतात आज दिल्ही तील सर्वात जास्त सरकारला पैसा हा हवेचे प्रदूषण कमी करण्यावर खर्च करावा लागत आहे .गेल्या वीस वर्षात वाहनामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रमाणात आठ पटीने वाढ झाली आहे .त्याच मुळे आज केंद्र सरकारला वाहनाच्या क्र्याब धोरनाला लागू कराव लागल .आज आपण वायू प्रदूषण हे फक्त वाहन पासून च नाही तर आपल्या घरातून सुद्धा मोठ्या प्रमाणात करत असतो .घरातील कचरा  प्लास्टिक जाळून आपण हवेचे प्रदूषण करत असतो .आज आपल्याला माहित आहे कि .प्लास्टिक जाळल्याने खूप घटक रसायने बाहेर पडतात तरी आपण ते जळत असतो . आज जवळ पास सर्वच शहर हे आपला कचरा जळतात इंदोर आणि एक दोन शहरे सोडली तर कोठेच कचर्याचे वर्गीकरण करून विलेवाट लावली जात नाही .खर तर आपण आपल्या घरा पासून कचर्याची वर्गीकरण करून विलेवाट लावली पाहिजेत .आजच्या प्रत्येक घरात रोजच कचरा  तयार होतो .जर आपण आपल्या कचर्याची आपणच वर्गीकरण करून विलेवाट लावली तर .जसे ओला कचरा हा आपण गांडूळ ,कॉम्पोस्ट ,नाडेप.खत तयार केल तर आणि इतर निघणारा घन कचरा परत रीसायकलिंग  करिता द्यायचा .त्याने प्रदूषणाला आळा बसणार हे नक्की ,असे खूप छोटी कामे आहेत ,ज्यातून आपण प्रदूषण होण्या पासून रोखू शकतो गरज आहे ते आपण अमलात आणण्याची .













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Ok

Featured post

चिकुनगुनियामुळे होणारी गंभीर लक्षणे ,

  चिकनगुनिया हा आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील डासांद्वारे मानवांमध्ये पसरणारा रोग आहे; इतर क्षेत्रांमध्ये तुरळक उद्रेक नोंदवले गेले आहेत. डे...