शुक्रवार, ८ जुलै, २०२२

जल प्रदूषण

जल प्रदूषण हि आजच्या घडीला खूप महत्वाची समस्या आपल्या समोर आहे .कारण पाण्या वाचून आपण सजीव राहू शकत नाही .                                                              जल प्रदूषण म्हणजे पाणी पिण्यासाठी उपयुक्त न राहणे ,त्यातील प्राणवायू प्रमाण कमी होणे म्हणजे जल प्रदूषण .                                                                                                             आज आपण घरगुती सांडपाण्याचे व्यावस्थापन योग्यप्रकारे केले जात नाही .त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते .सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणा सुस्थितीत नसल्यामुळे या प्रकिया व्यावस्थित केल्या जात नाहीत .अपुरे आणि मर्यादित ज्ञान यामुळे आपण सांडपाणी या वर काही प्रक्रिया करू शकत नाही .त्यामुळे सांडपाण्याचे बाष्पीभवन तरी होते किवा जमिनीत मुरून जाते .काही ठिकाणी सांडपाणी डबकी तयार होतात .आणि अनेक प्रकारच्या रोगांना कारणीभूत ठरतात .                                                                                                   भूगर्भातील जल साठ्यांचे  सांडपाण्यामुळे प्रदूषण होते .सतत येणाऱ्या पुरामुळे पाणथळ जागा नष्ट होतात .आणि घन कचरा मोठ्याप्रमाणात पाण्यात मिसळतो .याशिवाय अनेक ठिकाणी नाले ,नद्या यांच्या  पात्रात कचरा फेकला जातो .घरातील आताचे पाणी हे खूप घटक रसायने घेऊन बाहेर पडते जसे कि साबण ,शाम्पू ,ओईल , बराच काही आता आपण हे नदी नाल्यात सोडत असतो .                                                                                                                           आज देशाच्या सर्वच भागात नद्या आणि  तलावांच्या काठावर अनेक कारखाने उभे आहेत .शिवाय शेतेही आहेत .शेतामध्ये वापरले जाणारे  किड नाशके आणि खते यांच्यातील रसायने आज नद्या च्या पाण्यात आढळली आहेत .नद्यांच्या पाण्यात अंघोळ करणे ,कपडे धुणे भांडी घासणे याच बरोबर सकाळचा विधी करणे .या गोष्टी मुळे आज मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होते आहे . जल शुद्धीकरण करणे खूप खर्चिक बाब असल्याने सर लोकांना करता येईल एवडे सोपे नाही त्यामुळे आज या सर्वातून साथीचे व  रोग रोग पसरतात . त्यामुळे जल प्रदूषण कमी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे हे .जर असेच राहिले तर आपल्याला पाणी पिण्यासाठी  मिळणार नाही .                                                                                           १० वर्ष पूर्वी  गावातील  नदी  नाल्यातील सुद्धा पाणी  पिण्यासाठी  वापरले जात होते .मात्र आता ती परिश्तिती राहिली नाही .आधी सारखे नदी नाल्यातील पाणी हे पिण्या योग्य राहिले नाही .आज  त्या नदी  नाल्यात आपण केलेली घाण आपण टाकत आहे .त्यामुळे ते नदी नाले आता पूर्वी सारखे पाणी शुद्ध देऊ शकत  नाहीत .आज प्रत्येक गावातील नदी ओढे  नाले  हे गावातील सांडपाणी ,कचरा , प्लास्टिक मानवी मलमूत्र  यांनी आणि  मृत प्राणी यांनी हे नदी नाले दुषित झाले आहेत .आज गावातील महिला नदीत सांडपाणी बरोबर  भांडी धून या मुळे नदीत धूत असल्याने पाणी दुषित होत आहे . तसेच जनावरे मूत झाली कि ते नदीत आणून टाकली जातात .त्यामुळे तेथील पाणी दुषित होत आहे .                                                                           तसेच आज प्रत्येक शेतात खत ,तणनाशक ,कीडनाशक ,औषध  फवारली जातात . शेतातील ते रसायने पाणी पावसा सोबत नदी नाल्यात येतें त्यामुळे पाणी प्रदूषित होत आहे .तसेच आज  आपण स्वच्छ भारत अभियान  मध्ये  बांधलेले स्वचालाय याचे पाणी सुद्धा नदी नाल्यात सोडल्याने पाणी दुषित झाले आहे .                                                                    तसेच आज सर्वात जास्त  लोक हे देव धर्माच्या नावाखाली  पूजा पूजेच साहित्य  धार्मिक विधी हे केल्या नंतर  सर्व नदी तलाव किवा विहरी मध्ये टाकतात त्यामध्ये  राख ओईल .असल्याने ते पाण्यावर तरंगून पाणी प्रदूषित करतेच सोबत पाण्यात असलेले सजीव यांना मारण्याचे काम करत असते . तसेच  काही मूर्ख  लोक स्वताच्या फायद्या साठी पाण्यात विषारी औषधे  टाकून पाणी दुषित करत असतात . वरील पैकी कोणीही हि एक कृती केली नाहीतर  हे होणार प्रदूषण होणार नाही . करा प्रयत्न  होईल .





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Ok

Featured post

चिकुनगुनियामुळे होणारी गंभीर लक्षणे ,

  चिकनगुनिया हा आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील डासांद्वारे मानवांमध्ये पसरणारा रोग आहे; इतर क्षेत्रांमध्ये तुरळक उद्रेक नोंदवले गेले आहेत. डे...