पूजेसाठी तरी
हा सण आता केवळ महिलावार्गापुरता राहिला नाही .या दिवशी पुरुषांनीही वाडाच्या झाडाचे पूजन नवी झाडे लावून साजरे करावे .
प्रत्येक पुरुषांने आपल्या पत्नीसाठी एक झाड लावावे .आणि त्यांचे वर्षेभर संवर्धन करावे .
पार्श्वभूमी
सावित्रीने वडाच्या झाडाखाली यमाकडून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत मिळवले तो दिवस म्हणजे जेष्ठ शुद पोर्णिमेचा दिवस .या दिवसी महिला भगिनी वडाची पूजा करून पतीच्या दिर्घयुष्यासाठी प्रार्थना करतात .हे झाल पौराणिक व पारंपारिक सार .पण पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून आपल्याला पुढच्या पिढीसाठी त्याचे संवर्धन करण्यासाठी सावित्री बरोबरच सत्यावानानीही वडाची पूजा करण्याची वेळ आली आहे .या सणाच्या निमिताने काही प्रश्नाची उतरे मिळवण्याचा प्रयत्न गावांनी करावा .
संकल्पना
सहजपणे कुठेही दिसणारे झाड अशी वडाच्या झाडाची प्रसिदी होती.मात्र आता वडाची झाडे तोडली गेली आहेत .हि वस्तूस्थिती आहे .रस्ते विकासाच्या आड येणाऱ्या झाडामध्ये वडाच्या झाडाचा नंबर सर्वात वर लागतो .पर्यावरण संवर्धनात वडाच्या झाडाची भूमिका महत्वाची असल्याने आपण वडाच्या झाडांची पुन्हा एकदा गावात लागवड करणे आवश्यक झाले आहे .वडाच्या झाडा बरोबरच पिंपळ चिंच कडूनिंब अशी जमिनीची धूप थांबवणारी सावली देणारी दीर्घायुषी देशी झाडांची गावातील संख्या वाढवणे गरजेचे झाले आहे . अधिक माहिती आपण वट पौर्णिमेच्या दिवसी वडाची पूजा करताना महिलांना बघतो .पण या दिवसी वडाची पूजा का केलीवटवृक्ष जाते .वादाच्या झाडाचे महत्व काय याची माहिती अनेकांना नाही .वटवृक्षचे आयुस्ष्य मोठे असते .आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना ते सावली देण्याचे काम करते .वाडाच्या झाडाच्या पारंब्या या फांद्यावरून पुन्हा जमिनीत शिरतात आणि दुसरे झाड मूळ धरू लागते .त्यामुळे वडाच्या झाडाला अक्षय्यवृक्ष असेही संबोधतात .या झाडाचे आयुष्मान भरपूर असल्याने ते आपल्या अनेक पुढच्या पिढ्यांना सावली देते .वडाच्याझाडाचे मूळ पाण्याच्या दिशेने दूर पर्यंत वाढत जात असल्याने जमिनीची धूप थांबवते एक झाड सुमारे ५०० ग्यालन वाफ बाहेर सोडत असल्याने येण उन्हाळा त या झाडाखाली थंडावा असतो .वडाच्या झाडाला वर्षेभर फळे लागतात हि फळे अनेक पक्षी प्राणी यांचे अन्न आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Ok