शुक्रवार, १ जुलै, २०२२

महायज्ञ वृक्षारोपणाचा !

वृक्षरोपण

 वनी तीर्थी फिरून अला !आपला गाव नाही सुधारला !तो कैसा म्हणावा महाभला !एकटाचि !

गावानाही शहरसारखे करण्याचा स्थानिक मंडळीचा ध्यास चुकीचा नाही .सुधारणांच्या कालचक्राच्या फेऱ्यात न अडकता आपण भविष्यातील मोठ्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आतापासूनच तयारी करण्याची गरज आहे .  तर आपण सर्व मिळून हिरवाई वाढवण्यासाठी आपण या १ते ७ २०२२पर्यंत च्या लावण्याचा वृक्षारोपण महायज्ञ  वृक्षारोपणाचा !आम्ही  सुरु केला आहे त्यात गावांनी लोकांनी वृक्षारोपण करून समिधा अर्पण केल्यावर याची पूर्णाहुती होणार आहे .

गावे उजाड का झाली ..

गावे उजाड ओसाड होताना ,गावातील पाण्याचा स्त्रोत आटून जाताना आपण गावाचे भूमिपुत्र म्हणून त्याबद्दल आपापल्याच त्याचे गांभीर्य वाटत नाही ,जर का आपण गावाबद्दल गंभीर असतो तर मला आज आपल्याकडे झाडे लावण्याबद्दल सांगायची वेळच आली नसती .गावातील पाणी आटले,शेतातील उत्पन्न कमी झाले ,डोंगर बोडखे झाले ,माळरान उजाड झाले आणि आपण हे उघड्या डोळ्यांनी बघण्याशिवाय काहीच केल नाही आपल्या गावातील अनेक जण दरवषी पंढरपूर, तुळजापूर ,कोलाह्पूर, शिर्डी ,शेगाव ,माहूर ,बारा जोतिर्लिंग  साडेतीन शक्तीपीठअशा ठिकाणी दरवर्षी देवदर्शनासाठी यात्रा करतात जत्र यात्राना जातात .पण त्यांना गावाबद्दल काहीच वाटत नाही आणि ते गावासाठी काहीच करत नाहीत ,अशा लोकांबद्दल तुकोडोजी महाराजांच्या च  शब्दात सांगायचे झाले तर 

 वनी तीर्थी फिरून अला !आपला गाव नाही सुधारला !तो कैसा म्हणावा महाभला !एकटाचि !

जो अनेक तीर्थ यात्रा करून ,देवदर्शन करून पुण्य मिळवून आला.आपण मिळवलेले नुसते पुण्य गावावरचेसंकट दूर करू शकत नाही .त्यामुळे गावाला त्याचा काहीच उपयोग नाही !देवदर्शनाचे पुण्य पदरी घेताना जर त्याने आपला गावच सुधारला नाही तर केवळ देवदर्शनाने त्याला भलामाणूस  म्हणजे पुण्यवान कसं म्हणता येईल ? असा तुकोडोजी महाराजांचा करडा सवाल आपल्या सर्वाना आहे .
 चला या निमिताने गावात देवराई पुन्हा फुलवू ..





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Ok

Featured post

चिकुनगुनियामुळे होणारी गंभीर लक्षणे ,

  चिकनगुनिया हा आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील डासांद्वारे मानवांमध्ये पसरणारा रोग आहे; इतर क्षेत्रांमध्ये तुरळक उद्रेक नोंदवले गेले आहेत. डे...