गुरुवार, १४ जुलै, २०२२

पूर महापूर

 पूर महापूर आजच्या घडीला आपल्या समोर आलेल एक नैसर्गिक संकट .संकट जरी नैसर्गिक असाल तरी त्याला कारणीभूत आपण आहे .ते कस आपण  या ब्लोग मध्ये कळेल . पूर महापूर म्हटल कि आपल्या डोळ्या समोर येतो  नदी,नाले पाण्याने तुतुंब भरून वाहत असलेले नदी पात्र नदीला पूर हा दरवर्षी आपल्याला पाहला मिळतोच .दरवर्षी भारतात पूर महापुरामुळे हजारो लोक आपला जीव गमावत असतात .सर्वात जास्त जीवित हानी हि नदी काठच्या समुद्राच्या काठच्या लोकांना बसत असतो .

पूर महापूर येण्याची कारणे ?

१ धरण तलाव भरल्याने तेथील पाणी बाहेर सोडल्याने नदीला पूर येतात .

२ समुद्रात भूकंप ,सुनामी आल्याने ठेथिल पाणी बाहेर येऊन नद्यांना पूर येतात .

३ हिम सखालन बर्फ वितळून जवळच्या नद्यांना पूर येतात .

४  ढग फुटी झाल्याने जास्त तर आपल्याकडील नद्यांना पूर येतात .

५  सतत  मुसळधार  पाऊस आल्याने जास्त तर आपल्या कडील नद्यांना पूर येतात .  

अपघाताने काही नद्यांना महापूर येतात ,धरण तलाव फुटल्याने नद्यांना पूर येतात .असे बरेच कारणाने  नद्यांना पूर येत असतात .

या सर्व कारणांचा विचार जर केला तर काही कारणाना आपण जबाबदार आहे , आज आपल्याला माहित आहे कि पूर महापूर आधी पण येत होते मात्र त्यामध्ये जीवित हानी एवढी होत नसे .कारण त्याकाळी कोणी आपल्या फायद्या साठी जमिनी जंगल नद्या यांचा आपल्या फायद्यासाठी वापर करत नसे . 

आज आपण आपल्या फायद्यासाठी नद्याचा वापर करून घेत आहे .आज नद्या हे वेवसाय  मध्यम बनले आहे .रेती मुरूम ,गाळ ,दगड ,आज नद्यान मधून उपसणे चालू आहे .उपसण्याला काही मर्यादा असतात .मात्र आज त्या कोणी  पाळत नाही ,जंगल तोड , खनिज खाणकाम जोरात चालू आहे . तसेच मानवच झालेलं नद्या वरच अतिक्रमण  यामुळे हि आजकाल पुरे जास्त प्रमाणात येत आहेत .आज आपण जर कोल्हापूर .सांगली .मिरज ,कोकण  नातील काही जिल्हे  आणि विदर्भ  तील  गडचिरोली ,भंडारा ,गोंदिया ,चंद्रपूर ,आणि वर्धा ,या जिल्हातील पुरांचा  विचार केला तर आपल्याला लक्षात येईल कि हे सर्व जिल्हे ,खानिजनी भरलेले  जिल्हे आहेत . या जिल्ह्यांचा विचार जर केला तर आपल्याला कळेल कि या जिल्ह्यात जंगल , खनिज साठे मोठ्या प्रमाणात आहेत .आणि आता त्या ठिकाणी  खनिज खोद्कन आणि जंगल तोड हि मोठ्या प्रमाणात होत असल्याने .जंगल जमिनी ह्या पाण्याला जास्त वेळ थांबू शकत नाहीत त्यामुळे पावसाच पडलेल पाणी जमिनीत मुरण्या आधीच  वाहून जात आहे .मोठ्या प्रमाणात जंगल तोड आणि खनिजांचा उपसा यामुळे पाणी थांबला जागा राहिल्या नाहीत . पूर्वी जंगल खूप घनदाट असत त्यामुळे पावसाच पाणी झाडावर पडून ते जमिनीत मुरात असे ,आणि जमिनी ह्या झाड आणि माती घाट  धरून ठेवल्याने  माती वाहून जात नव्हती त्यामुळे  पाणी हे जमिनीत मुरात असे .मात्र आज हि अवस्था झाली कि  नदी आणि जंगल हे मानवाच्या हस्तक शपामुळे  अधिसारख्या पाण्याला साठवण्यात असमर्थ ठरत आहेत .आज बहुतेक नद्या ह्या मातीने गळल्या गेल्या आहेत त्यामुळे त्या पाणी मुरण्यास असमर्थ ठरत आहेत .जंगल तोडीमुळे माती हि मोठ्या प्रमाणात वाहून येवून नदी खोली कमी झाली आहे त्यामुळे ,आज पडलेल पाणी साठवला जागा राहिली नाही . तसेच आज मानवाने जागेच्या हवेसाठी नदी काठावर घरे बंधली आहेत . नद्याच नैसर्गिक  अस्तित्व राहील नाही .त्यामुळे आज नद्यांना महापूर पूर येत आहेत .वाढत शहरी करण   हेही काही प्रमाणात पुराना कारणी भूत आहे .आज मोठमोठ्या सह्रापासून ते लहान गावात हि  विकासाच्या नावावर जी पर्यावरनाची  हानी करणे चालवली आहे ती .जसे आज प्रत्येक शहरात कॉन्क्रीट  बांधकामे झाली आहेत .त्यामुळे पडलेला पाऊस हा जमिनीत मुरला जात नाही . त्यामुळे पाऊस पडला कि ते पाणी थेट नदी ला जाऊन भेटते त्यामुळे पाण्याला मुरला जागा न मिळाल्याने ते नदी मध्ये येते,आता पाऊस पडला कि लगेच नदीत जाते .                                                                                             मात्र आधी अस होत नसे पाऊस पडला कि किमान २४ तास तरी लागत असे पाणी नदीला जायला त्यामुळे नदीत पाणी विसर्ग होत असे त्यामुळे नद्यांना जास्त पाणी येत नसे  त्यामुळे पूर जरी अला तरी त्याची तीव्रता  कमी असे ,त्यामुळे जीवित हानी काही होत नव्हती तसेच आधी चे लोक हे नदीपासून दूर आणि उंच ठिकाणी राहत असत त्यामुळे पुरामुळे जीव जाने हे होत नसे . आता मात्र पूर्वी सारख जीवन रहल नाही माणूस हा फायद्या साठी काही कराला तयार आहे .त्यासाठी जीव गेला तरी चालेल ..आता गरज आहे आपण परत ते दिवस आणून निसर्ग आणि माणूस एकत्र राहण्यासाठी प्रयत्न करण्याची चला तर मग करू प्रयत्न ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Ok

Featured post

चिकुनगुनियामुळे होणारी गंभीर लक्षणे ,

  चिकनगुनिया हा आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील डासांद्वारे मानवांमध्ये पसरणारा रोग आहे; इतर क्षेत्रांमध्ये तुरळक उद्रेक नोंदवले गेले आहेत. डे...