शुक्रवार, १ जुलै, २०२२

ग्रीन आर्मी ! हरित सेना

ग्रीन आर्मी  हरित सेना 

 लष्करात साजरा करण्यात येणाऱ्या आर्मी डे च्या धर्तीवर हरित सेना दिवस साजरा करणे .

हरित सेनेच्या जवानांनी या दिवशी वर्षेभर केलेल्या वृक्षारोपणाचा आढावा घेऊन कोणती झाडे जगवण्यासाठी काय केले पाहिजेत हे सांगावे 

पार्श्वभूमी

देशासाठी जीवन जीवन समर्पित करणारे .आणि, एकात्म ग्मारीन नवतावादी संकल्पना मांडणारे, पंडित दीनदयाळ उपाध्याय  यांचे निधन ११ फेब्रुवारी १९६८ या दिवसी झाले .अज्ञात  मारेकर्यांनी त्यांची हत्या केली ,पण त्यांच्या विचारांची हत्या करू शकले नाहीत .त्यामुळे अशा प्रेरणा दायी  व्यक्तिमत्वाचे जीवन आपल्याला हि हिरवाई वाढवण्याच्या कामी प्रेरणा देईल असा विश्वास वाटल्याने त्यांचा स्मुती दिन हा हरित सेना दिन म्हणून साजरा केला जातो 

संकल्पना 

आज कोट्यावधी सैनिकांची भारती असलेली हरित सेना ( ग्रीन आर्मी  ) राज्यभर तयार झाली आहे .ज्या प्रमाणे लष्करात दरवर्षी १५ जानेवारी हा आर्मी डे म्हणून साजरा केला जातो ,त्याच प्रमाणे ११ फेब्रुवारी हा ग्रीन आर्मी डे साजरा केला पाहिजेत  या दिवशी मागील वर्षी लावलेल्या व पुढील वर्षी लावायच्या वृक्ष लागवड बाबत चर्चा आखणी केली जाते /जावे 

हरितसेनेचे वार्षिक उपक्रम .....जागतिक स्तरावर वन वन्यजीव व पर्यावरण संबंधात दिनदर्शिका प्रमाणे साजरा करणे .प्लास्टिक पिशवीच वापर टाळण्यासाठी कापडी पिशवी बनविणे . उघड्यावर शौच करू नये .या विषयी प्रबोधन पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्या विषयक जनजागृती करणे . वृक्षारोपण संरक्षण करणे .

हरितसेना उदिष्टे ...*१ .वने हि माणसाला मिळालेली एक नैसर्गिक संपदा आहे .वनांचे पुनरुजीवन करणे शक्य आहे त्यासाठी आवश्यक आहे उत्तम वन व्यावस्थापन .*२ प्रत्येक नागरिकास वन व वन्यजीवांचे संरक्षण संवर्धन करण्याची संधी उपलब्ध करून देणे .*३ लोकसहभागातून वन वन्यजीव संवर्धन प्रभावी पने करणे .

हरितसेना सैनिकाची भूमिका ..वन विभागामार्फत आयोजित वृक्ष लागवड ,वृक्ष दिंडी वनाच्या संरक्षणा  करिता सामुहिक गस्त ..वणव्याच्या हंगामात प्रत्यक्ष सहभाग वन विभागामार्फात वनमहोत्सव कालावधीत व वन्य जीव सप्ताह संरक्षण उपक्रमा मध्ये सहभाग जनजागृती कार्यक्रमा मध्ये सहभाग ..

हरितसेने मध्ये कोण सहभाग घेऊ शकते ..१ *राज्यातील प्रत्येक नागरिक हरित सेनेचा सदस्य होऊ शकते .२ *सामुहिक संस्था स्वरुपात सुद्धा सदस्य नोंदणी करता येईल .

सदस्य कसे होता येईल ...हरितसेनेच्या सदस्यत्वांसाठी www.greenarmy.mahaforest.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर नोंदणी करावी .नोंदणी साठी आवश्यक दस्तावेज खालीलप्रमाणेकोणतेही एक ओळखपत्र-१ आधारकार्ड २ मतदान ओळखपत्र ३ ड्रायविंग लायसन्स. ४ शालेय /शाशकीय ओळखपत्र 

या मोहिमेमुळे जनतेला होणारा फायदा ...१ *जे स्वयंसेवक वर्षेभर सक्रिय सहभाग घेतील ,त्यांची शासनामार्फत विशेष दखलघेऊन त्यांना प्रमाणपत्र  किवा पारितोषिक देऊन पुरस्कृत केले जाणार आहे .२ *स्वयंसेवक यांना वन क्षेत्र अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्पात लागणाऱ्या प्रवेशात शुल्क यात व इतर शुल्कात सवलत देण्याची तरतूद शासनामार्फत विचाराधीन आहे ...

पेडो का एक एक हिस्सा, मानव के आता काम ,पेड धरती पर मनुष्य के ,लिए हेय एक वरदान ! 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Ok

Featured post

चिकुनगुनियामुळे होणारी गंभीर लक्षणे ,

  चिकनगुनिया हा आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील डासांद्वारे मानवांमध्ये पसरणारा रोग आहे; इतर क्षेत्रांमध्ये तुरळक उद्रेक नोंदवले गेले आहेत. डे...