रविवार, ५ डिसेंबर, २०२१

World soil day

   
Keep soil alive 
Protect soil biodiversity

    आजच्या जागतिक मुदा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। 



आज जागतिक माती दिन !

माती (मृदा) हा अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करण्यासाठी ५ डिसेंबर हा ‘जागतिक मृदा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
                                                                                                                                                                            आज  आपण माती शिवाय काहीच उत्पादित करू शकत नाही .आज जगात खूप शोध लागले मात्र मातीला पर्याय  अजून सापडला नाहीय .आजही कुठले हि पिक उत्पादन  घेण्य साठी माती आवश्यक आहे .आज साधारण आपल्या भागात जमीन हि मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणारी जमीन हि प्रत्येक पिकासाठी आवश्यक आहे .आणि त्या जमिनीचा सामू हा जवळ जवळ जमिनीचा सामू हा ६.५ ते ८ असावा सामू ६ पेक्षा कमी असणार्या जमिनीत पिके हि यात नाहीत ,आज भारतातील जमिनी ह्या हवामान प्रजन्य मन  भोगोलिक परिस्थिती नुसर जमिनी ह्या काळी किवा तांबडी  आढळते . 

जमिनीचे कार्य -;
 १ जमिनीतील सुक्षम जीवांचे संगोपन करणे .
२ पिकांना आवश्यक तेवढा ओलावा निर्माण करून देणे .
३ जमिनीतील अन्नद्रव्यांचे उपयोग पिकांच्या वाढीसाठी व अन्न निर्यातीसाठी करणे .
 ४ मातीतील खनिजे  उपलब्ध करून देणे .

मातीचे महत्व ,
                    मातीचे महत्व खूप आहे .आज आपल्याला माहिती आहे कि विज्ञानामुळे खूप शोध लागले पण मातीला पर्याय नाही मिळाला .म्हणून आज  मातीच्या  एक एक कनाला  महत्व आहे .मातीचा एक कण निर्माण होण्याला हजारो वर्षे लागतात मात्र तोच एक मातीचा कण आपण खूप सहज  नष्ट करत आहे .जमीनीच प्रदूषण करून  .आज आपण मातीत खूप घटक मिसळून  मातीला नापीक प्रदूषित केल आहे .आज जमिनी ह्या क्षार युक्त आणि चोपण झाल्या आहेत मानवाच्या चुका मुळे मानवाने अति उत्पादन घेण्याच्या नादात आज जमिनी ह्या चोपण आणि क्षार युक्त केल्या आहेत .खाते, कीडनाशक  ,तन नाशके ,  अति सिंचन यामुळे जमिनी  जमिनी नापिकी झाल्या आहेत .                                                                                                                                                                         माती संवर्धन  मोहीम ,
                                आज आपल्या सर्वांना गरज आहे ती माती संवर्धन करण्याची मातीचे महत्व सर्वाना नाहीत करून देण्याची .मातीला  सुपीक आणि  उपयोगी बनवण्याची  त्यासाठी आपल्याला मातीला प्रदूषित करणाऱ्या  रासायनिक घटकाच्या  वापरावर बंदी आणून मातीला सुपीक उपयोगी बनवण्य साठी प्रयत्न करण्याची .शेतकरी  यांना     रासायनिक खतला , कीडनाशक , तपनाशक ला पर्यायी  सेंद्रिय  घटक उपलब्ध  करून देणे .           
   
सेंद्रिय शेती ,
                 आज आपण पाहत आहोत कि रासायनिक शेतीतून काय दुषपरिनाम होत आहेत .त्याला  पर्यायी म्हून आज सर्वांनी सेंद्रिय शेती  करणे  फायद्याचे आहे .ते खूप महत्वाचे असून काळाची गरज  आहे .शेंद्रीय पद्धतीने शेती केल्याने मातीचे  संगोपन आणि संवर्धन चांगल्या पद्धतीने होते हे शिध झाले आहे .


      माती हि आजची जननी आहे ,जी असंख्य जीवाला अन्न पाणी पुरवत आहे ,त्यामुळे मातीला वाचवणे गरज नसून आपले कर्तव आहे ,धरणी ला आपण माता मानत आलो आहे ,आज गरज आहे आपण तिला आपल्या आई सारख साभाळ करण्याची .चला तर मग काळजी घेऊ ..

Featured post

चिकुनगुनियामुळे होणारी गंभीर लक्षणे ,

  चिकनगुनिया हा आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील डासांद्वारे मानवांमध्ये पसरणारा रोग आहे; इतर क्षेत्रांमध्ये तुरळक उद्रेक नोंदवले गेले आहेत. डे...