जागवा अपुले अंतर्मन !जगण्यासाठी हवे वनसंवर्धन !
*वन संरक्षण आणि वनसंवर्धनाचे महत्व पटवणारा सप्ताह .
*प्रत्येकाने एक तरी झाड लावावे आणि सांभाळावे हि अपेक्षा .
पार्श्वभूमी
भारतीय संस्कृतीमध्ये माणूस आणि जंगल यामधील द्रुढ नाते नाना प्रकारे सांगितले गेले आहे.परंतु गेल्या काही दशकात आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे .हि जाणीव व्हावी आणि हि परिश्तिती सुधारण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडून केला जावा यासाठी वन महोत्सवामधून प्रोत्साहनदिले जाते .
मूळ संकल्पना व सुरुवात
भारतात १९५० साली के. एम .मुन्शी यांच्या पुढाकाराने वनमहोत्सव सुरु झाला .ते त्यावेळी केंद्र सरकारमध्ये अन्न आणि कृषी मंत्री होते .
त्यावेळी भारतात जंगल क्षेत्र भरपूर होते परंतु कदाचित पुढील गरजा आणि धोका ओळखून ,जंगलाच्या संरक्षणासाठी, त्यांनी वनमहोत्सवाला चालना दिली .कारण शहरीकरण आणि औधोगीकरण हवे असेल तर वाटेतली झाडे तोडली पाहिजेत असे ( चुकीचे ) समीकरण मूळ धरू लागले होते .
महत्वआणि गरज
खरे तर जंगलापासून फक्त मानवालाच नाही ;तर संपुर्णसजीव -निर्जीव सृष्टीला अनेक फायदे होतात .हवामानाचे संतुलन ,नियमित पाऊस,शुद्धहवा वळवण्टीकरणापासून उद्भवणाऱ्या समस्या दूर करणे ,पशुपाक्षानायोग्य अधिवास देणे ( राहण्याची जागा )जमिनीची धूप तसेच पाण्याचे आक्रमण थोपवणे हे फायदे तर होतातच शिवाय आपल्याला लाकूड आणि इतर वन संपती मिळते ती वेगळीच ! पण आपली चूक इथेच होत आहे .माणसाच्या हावरटपणामुळे तात्पुरत्या फायद्यासाठी मनुष्य जंगलाची तोड करत चाललो आहोत .
आपण काय करावे .
*वर्षाच्या सुरवातीपासून केलेल्या वृक्षरोपणाचा आढावा घ्यावा .
*या सप्ताहात गावातील शेतांच्या बांधावर झाडे प्रत्येकाने पुढाकार घ्यावा .
*गावाच्या देवस्थानासाठी देवराई सारखा प्रकल्प तयार करून त्याला गावातील प्रत्येक वेक्तीने सहभाग घेऊन झाडे लावण्यास मदत करावी .
*या सप्ताहात गावकऱ्यांनी कोण कोणती झाडे कशा पद्धतीने लावावीत याबद्दल एक मेकांना मार्गदर्शन करावे .
*झाडे लावण्यासाठी रोपे उपलब्ध करून द्यावीत .
*या निमिताने गावाच्या परिसरातील स्थानिक झाडाची माहिती संकलित करावी .
*गावात कुऱ्हाड बंदिसारखा निर्णय करता येईल का यावर चर्चा,विचारविनिमय करावा .
जड -पत्तो से औषधी ,पुष्पो से स्वागत -सन्मान ,
पेडो का हर एक हिस्सा, आता हेए मनुष्य के काम !