! पर्यावरणाचे राजदूत !
आज आपण या पेज वर पर्यावरणाचे राजदूत कोण आहेत आणि त्यांचा पर्यावरणाशी कसा कोणता आणि काय संबध या विषयी माहिती घेणार आहोत .आपण यांना राजदूत का मानतो आणि ते का त्यांचे आजचे महत्व काय . आणि त्यांची ओळख या ब्लोग मार्फत करून घेणार आहोत .हे सर्व सजीव जीव रोज आपण पाहतो आणि त्यांच्या सोबत आपला रोज सहवास लाभतो .चला तर त्यांची ओळख करूया ...
राज्यप्राणी : शेकरू
शेकरू हि खारीची एक प्रजाती असून महारास्त्रामध्ये ती प्रामुख्याने भीमाशंकर ,वासोटा ,माहुली व फणसाडच्या डोंगरात आढळते .फळे आणि मधुरस हे त्याचे खाद्य आहे .त्याचे शास्त्रीय नाव रटूफा इंडीका असे असून इंग्लिशमध्ये याला इंडियन जायंट स्कीरल असे म्हणतात .
राज्यपक्षी : हरोळी
हरियाल किवा हरोळी हा पक्षी कबूतराच्या वंशातील आहे .याचे शास्त्रीय नाव ट्रेरोन फोनिकॉप्टेरा असे असून त्याला इंग्लिशमध्ये यलो फुटेड ग्रीन पिजन म्हणतात .मराठीत याला हिरव्या रंगाचे कबुतर असेही म्हणतात .हा पक्षी आपणास गावातील पडीक घरे जुने वाडे वाडचे झाड किवा टेलेफोन तर मंदिरे येथे पहावयास मिळतात .
राज्यफळ: आंबा
आंबा हे महाराष्ट्र राज्याचे वैशिष्टे पूर्ण फळ असून हापूस जातीच्या आंब्याची जगभरात निर्यात केली जाते भारताचे हे राष्ट्रीय फळ आहे आणि भारत हा आंबा उत्पादनात जगात १ नंबर आहे . आणि भारतीय आंब्यांना जगात खूप मागणी आहे . कोकणातील आंब्यांना विशेष मागणी आहे .
राज्यफुल: जारुळ
हे फूल जारुळ बोंद्रा किंवा बुन्द्रा या नावाने ओळखले जाते .त्याचा रंग लालसर जांभळा असतो .फेब्रुवारी -मार्च महिन्यात या झाडाला बहर येतो आणि एप्रिल ते जून या काळामध्ये हि फुले फुलतात .भरपूर पाणी मिळणाऱ्या ठिकाणी हे झाड वाढते.ल्यागरस्त्रोमिया असे याचे शास्त्रीय नाव आहे .
राज्य फुलपाखरू : ब्लुयू मॉरमॉन
सर्वात मोठ्या आकाराचे सर्दन बर्डविंग हे फुलपाखरू दक्षिण भारतात आढळते .या फुलपाखराच्या खालोखाल महाराष्ट्र मध्ये दिसणाऱ्या या फुलपाखराचा आकार मोठा आहे , पावसाळ्यात कमी पावसाच्या प्रदेशात हे फुलपाखरू स्थलांतर करते .ते मखमली रंगाचे असून त्याच्या पंखावर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात .श्रीलंका ,भारतातील पश्चिम घाट,दक्षिण भारत आणि पूर्व समुद्र किनारपट्टीवर हे फुलपाखरू आढळते .त्याला निलपरी असे म्हंटले जाते .खाण्याचे लिंबू ,माकड लिंबू ,मेनका अशा वूक्षच्या पानावर या फुलपाखराची मादी अंडी घालते .अंड्यातून ठराविक दिवसांनी अळी बाहेर पडते .पाने खाऊन हि अळी मोठी होते .आणि तिचे फुलपाखरात रुपांतर होते .राज्य फुलपाखरू जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे .
या प्रमाणे वरील राजदूत आपणास दिसले तर त्यांना अन्न आणि पाणी दया आणि त्यांचे रक्षण करा .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Ok