गुरुवार, ३० जून, २०२२

१ ते ७ जुलै वन महोत्सव ( वन सप्ताह )

  जागवा अपुले अंतर्मन !जगण्यासाठी हवे वनसंवर्धन !


         *वन संरक्षण आणि वनसंवर्धनाचे महत्व पटवणारा सप्ताह .

         *प्रत्येकाने  एक तरी झाड लावावे आणि सांभाळावे हि अपेक्षा .

   पार्श्वभूमी

              भारतीय संस्कृतीमध्ये  माणूस आणि जंगल यामधील द्रुढ नाते नाना प्रकारे सांगितले गेले आहे.परंतु गेल्या काही दशकात आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे .हि जाणीव व्हावी आणि हि परिश्तिती सुधारण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडून केला जावा यासाठी वन महोत्सवामधून प्रोत्साहनदिले जाते .

मूळ संकल्पना व सुरुवात 

       भारतात १९५० साली के. एम .मुन्शी यांच्या  पुढाकाराने  वनमहोत्सव सुरु झाला .ते त्यावेळी केंद्र सरकारमध्ये अन्न आणि कृषी मंत्री होते .

त्यावेळी भारतात जंगल क्षेत्र भरपूर होते परंतु कदाचित पुढील गरजा आणि धोका ओळखून ,जंगलाच्या संरक्षणासाठी, त्यांनी वनमहोत्सवाला चालना दिली .कारण शहरीकरण आणि औधोगीकरण हवे असेल तर वाटेतली झाडे तोडली पाहिजेत असे ( चुकीचे  ) समीकरण मूळ धरू लागले होते .

 

महत्वआणि गरज 

      खरे तर जंगलापासून फक्त मानवालाच नाही ;तर संपुर्णसजीव -निर्जीव सृष्टीला अनेक फायदे होतात .हवामानाचे संतुलन ,नियमित पाऊस,शुद्धहवा वळवण्टीकरणापासून उद्भवणाऱ्या समस्या दूर करणे ,पशुपाक्षानायोग्य अधिवास देणे  ( राहण्याची जागा  )जमिनीची धूप तसेच पाण्याचे आक्रमण थोपवणे  हे फायदे तर होतातच शिवाय आपल्याला लाकूड आणि इतर वन संपती मिळते ती वेगळीच !  पण आपली चूक इथेच होत आहे .माणसाच्या हावरटपणामुळे तात्पुरत्या फायद्यासाठी  मनुष्य जंगलाची तोड  करत  चाललो आहोत .

 आपण काय करावे .

 *वर्षाच्या सुरवातीपासून केलेल्या वृक्षरोपणाचा आढावा घ्यावा .

  *या सप्ताहात गावातील शेतांच्या बांधावर झाडे  प्रत्येकाने पुढाकार घ्यावा .

  *गावाच्या देवस्थानासाठी देवराई सारखा प्रकल्प तयार करून त्याला              गावातील प्रत्येक वेक्तीने सहभाग घेऊन झाडे लावण्यास मदत करावी .

  *या सप्ताहात गावकऱ्यांनी कोण कोणती झाडे कशा पद्धतीने लावावीत          याबद्दल एक मेकांना मार्गदर्शन करावे .

  *झाडे लावण्यासाठी रोपे उपलब्ध करून द्यावीत .

   *या निमिताने गावाच्या परिसरातील स्थानिक झाडाची माहिती संकलित                    करावी . 

   *गावात कुऱ्हाड बंदिसारखा निर्णय करता येईल का यावर                              चर्चा,विचारविनिमय  करावा .

जड -पत्तो से औषधी ,पुष्पो से स्वागत -सन्मान ,

पेडो का हर एक हिस्सा, आता हेए  मनुष्य के काम !

बुधवार, २९ जून, २०२२

पर्यावरणाचे राजदूत !

!  पर्यावरणाचे राजदूत !



आज आपण या पेज वर  पर्यावरणाचे  राजदूत कोण आहेत आणि त्यांचा पर्यावरणाशी  कसा कोणता  आणि काय  संबध या विषयी  माहिती घेणार आहोत .आपण यांना राजदूत का मानतो  आणि ते का त्यांचे आजचे महत्व काय . आणि त्यांची ओळख या ब्लोग मार्फत  करून घेणार आहोत .हे सर्व  सजीव जीव रोज आपण पाहतो  आणि त्यांच्या सोबत आपला रोज सहवास  लाभतो .चला तर त्यांची ओळख करूया ...

राज्यप्राणी : शेकरू 



      शेकरू हि खारीची एक  प्रजाती  असून  महारास्त्रामध्ये  ती प्रामुख्याने भीमाशंकर ,वासोटा ,माहुली व फणसाडच्या डोंगरात आढळते .फळे आणि मधुरस हे त्याचे खाद्य आहे .त्याचे  शास्त्रीय नाव रटूफा इंडीका असे असून  इंग्लिशमध्ये याला  इंडियन जायंट स्कीरल असे  म्हणतात .


राज्यपक्षी : हरोळी



हरियाल किवा  हरोळी हा पक्षी कबूतराच्या वंशातील  आहे .याचे  शास्त्रीय नाव ट्रेरोन फोनिकॉप्टेरा असे असून त्याला  इंग्लिशमध्ये यलो फुटेड ग्रीन पिजन  म्हणतात .मराठीत याला हिरव्या रंगाचे कबुतर असेही म्हणतात .हा पक्षी आपणास गावातील पडीक घरे जुने वाडे वाडचे झाड किवा टेलेफोन तर मंदिरे येथे पहावयास मिळतात .


राज्यफळ: आंबा 



आंबा हे महाराष्ट्र राज्याचे वैशिष्टे पूर्ण  फळ असून  हापूस जातीच्या आंब्याची  जगभरात निर्यात केली जाते भारताचे हे राष्ट्रीय फळ आहे आणि भारत हा आंबा उत्पादनात जगात १ नंबर आहे . आणि भारतीय आंब्यांना  जगात खूप  मागणी आहे . कोकणातील आंब्यांना विशेष मागणी आहे .


राज्यफुल: जारुळ



      हे  फूल जारुळ बोंद्रा किंवा बुन्द्रा या नावाने  ओळखले जाते .त्याचा रंग लालसर जांभळा असतो .फेब्रुवारी -मार्च महिन्यात या झाडाला बहर येतो आणि एप्रिल ते जून या काळामध्ये हि फुले फुलतात .भरपूर पाणी मिळणाऱ्या ठिकाणी हे झाड वाढते.ल्यागरस्त्रोमिया असे याचे  शास्त्रीय नाव आहे .


राज्य फुलपाखरू : ब्लुयू मॉरमॉन



   सर्वात मोठ्या आकाराचे सर्दन बर्डविंग हे फुलपाखरू दक्षिण भारतात आढळते .या फुलपाखराच्या खालोखाल महाराष्ट्र मध्ये दिसणाऱ्या या फुलपाखराचा आकार मोठा आहे , पावसाळ्यात कमी पावसाच्या प्रदेशात हे फुलपाखरू स्थलांतर करते .ते मखमली रंगाचे असून त्याच्या पंखावर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात .श्रीलंका ,भारतातील पश्चिम घाट,दक्षिण भारत आणि पूर्व समुद्र किनारपट्टीवर हे फुलपाखरू आढळते .त्याला निलपरी असे म्हंटले जाते .खाण्याचे लिंबू  ,माकड लिंबू ,मेनका अशा वूक्षच्या पानावर या फुलपाखराची मादी अंडी घालते .अंड्यातून ठराविक दिवसांनी अळी बाहेर पडते .पाने खाऊन हि अळी मोठी होते .आणि तिचे फुलपाखरात रुपांतर  होते .राज्य फुलपाखरू जाहीर करणारे महाराष्ट्र हे  पहिलेच राज्य आहे .    

या प्रमाणे वरील राजदूत आपणास दिसले तर त्यांना अन्न आणि पाणी  दया आणि त्यांचे  रक्षण  करा .








८ जून जागतिक महासागर दिन

 सागरा  (चा ) प्राण तळमळला ..


       आजची महासागराची  काय अवस्था  हे आपल्याल्या सांगायची झाली तर जवळ जवळ 

* पृथ्वीचा ७५ टक्के हिसा व्यापणाऱ्या महासागराणा  पर्यावरणात महत्वाचे स्थान आहे .

*हजारो जलचरांचे  अधिवास  तर कोट्यावधी  मानवांचे अन्नदाते म्हणजे  महासागर '

*माणसाने केलेला कचरा  आणि प्रदूषण  याचा फटका महासागराना बसला आहे . 

*मानवाचे पाप धुण्याचे काम आजवर हा महासागर करत आहे .

महासागर हे कितीही  विशाल असले  तरी माणसाने केलेली किती  कचरा त्यांनी पोटात घ्यावा यालाही अखेर मर्यादा आहे .आपण हि मर्यादा ओलांडल्यामुळे तेथील जीवसृष्टीला आणि अन्नासाखाल्याना  धक्का बसला आहे .यामुळे माणसाला मिळणारे  मासे तर कमी झाल्रे  आहेतच ; शिवाय हवामानावरही विपरीत परिणाम होत आहे .

मूळ संकल्पना व सुरवात 

समुद्र दुषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे या संदर्भातला प्रस्ताव १९९२ मध्ये  कॅनडा ने   ,ब्राझिलमध्ये झालेल्या वसुंधरा शिखर परिषेदेत मांडला .त्या;ला सयुक्त राष्ट्र  संघाने २००८ मध्ये मान्यता दिली .तेव्हा पासून ' द ओशन  प्रोजेक्ट ' या अमेरिकन  संस्थेच्या  सहक्र्याने  हा दिवस अंतर राष्ट्रीय  पातळीवर साजरा होऊ लागला . 

गैर समाज !   

सांडपाणी ,औधोगिक प्रदूषके  ,मुदत संपलेली  व घटक रसायने ,प्लास्टिक च्या बाटल्या .नि पिशव्या ...कचरा  कोणताही  असो ---'' फेका  समुद्रात  ! अहो कोवढआ मोठा आणि खोल  समुद्र , एवढ्याश्या  कचर्याने  काय होतय  .हि प्रथा जगभरातील  बहुतेक सर्वानीच पाळ ल्यामुळे आता मात्र परीशिती  गंभीर बनली आहे .मासे मिळवण्या साठी अधिकाधिक खोल समुदरात जावे  लागत आहे .पाण्याचा दर्जा घसरला आहे .हवामानावर  परिणाम होत आहे ,विशिष्ट  सजीव नष्ट होत आहेत ........

आपण काय  करावे  

*या दिवसी  मुलांना समुद्र काठी सहल घडवून आणल्यास चांगले .किवा  वर्षातून एकदा तरी समुद्राचे दर्शन होईल     असा कार्यक्रम आयोजित करावा .

*पृथ्वीचा ७५ टक्के  भाग पाण्याने म्हणजेच महासागराणी कसा व्यापला आहे हे मुलांना  इतरांना सांगून त्याबद्लची  अधिक माहिती देण्यात यावी .

*समुद्रात असलेल्या सजीवांची माहिती सर्वाना करून देणे .

*या सजीवांच्या  सरक्षाना  साठी समुद्र ,कचरा  व प्रदुषणं पासून लांब ठेवण्याची गरज काय याची माहिती  द्यावी .

*किनारपट्टीवरील  गावांनी आपापल्या गावाला असलेल्या समुद्र किनार्याची काळजी घेणे  तेथे  कचरा ,व प्रदूषण होणार नाही  या बदल येणाऱ्या पर्यटकांच्या जागुती करणे  काळजी घ्यावी .

*गावच्या किनारपटइ चे संरक्षण करण्याची जबाबदारी गावांनी स्वीकारणे .

जल हि जीवन हे !

*








मंगळवार, २८ जून, २०२२

वुक्ष संवर्धन दिन ‌‌(२३जुलै २०२१)


वुक्ष संवर्धन दिन . या दिवसा बद्दल सांगायचे झाले तर. वुक्ष हे आपल्या  रोजच्या  जीवनातील एक भाग  आहे .झाडे वाचून आपण एक दिवस पण राहू शकत नाही .झाडे हे  मानवासाठी एक कल्पवूक्ष  म्हणून काम करते .आपल्याला माहित असेल कि एक ५०पन्नस वर्षे  ज्जुने झाड किती  उपयोगी आहे 
     फक्त एक झाड  लावा ! कारण  कि  
१)३५  लाख  रुपयाच्या किमतीचे वायूचे प्रदूषण टाळते .
२)१५ लाख रुपय किमतीचे ओक्शिजन  उत्पादन .
३ )४० लाख रुपय किमतीचे पाण्याचे  रिसायकलिंग 
४ ) ३ किलो कार्बन चा एका वर्षात नाश  करते .
५ ) एक परिपूर्ण झाड १०० माणसाचे  जेवण शिजवून तयार करू शकते '
६ )२ अंशनी आसपासचे वातावरणातील  तापमान कमी  करू शकते .
७ )एका झाडापासून एका कुटंब  चे सर्व  साहित्य  तयार होते .
८ )१२ विध्यार्थी  च्या शिक्षणासाठी वह्या पुस्तके तयार करू शकते .
९ )झाड माणसाला लहानपणीच्या  पान्गुल्गाड्या पासून ते तारुण्यातील आराम खुर्ची  पर्यंत म्हातर पनातील  हातातील          कठीपासून ते साम्शानातील लाकडापर्यंत साथ देते .
१० )बहारलेल्या एका झाडावर जवळजवळ १०० पक्षी घरटे बांधून राहू शकतात .त्याच्या वर त्याच्या साधारण २५                 पिड्या जन्माला येतात .मधमाशांचे पोळे झाडावरती असल्यास हीच संख्या लाखाच्या घरात जाऊ शकते .
११ )प्रत्येक ८ मन या प्रमाणात २५ ते ३० माणसांचा  अंतिम संस्कार जलन करू शकते .
१२ )५० किलो मातीमध्ये पाला पाचोळा ची भर पडून जमिनिचा  कस  सुधारतो .
१३ १८ लाख  रुपयांच्या किमतीची जमिनीची धूप थांबते .
     या सोबतच झाडे  फळ फुले  सावली बराच काही देवून जातात .
       ५० वर्षात झाड काय करते व आपण माणसे ५० वर्षात काय करतो  याचा  लेखा  जोख या वरून तरी प्रत्येकाने            यावर विचार करावा .आपण माणसाने याच ५० वर्षात फक्त पर्यावरणाचा  नाश  केला 
        मानव निसर्गापासून दूर गेल्याने हे मुख्यता घडते आहे .त्यामुळे जैव्विव्धेतेचा  नाश पावत आहे 
! जागे व्हा ! कोमेजते आहे  धरणी माय ! दुष्काळी  क्षेत्र  पसरवत आहे अपले पाय !











शुक्रवार, २० मे, २०२२

World bee day

मधमाश्या !

मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल.. हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ . ते सांगतात कि मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही.अश्या अनेक बाबी त्यांनी जगासमोर मांडल्या आहेत. विशेष म्हणजे जे अन्न परागीभवन होऊन येत नाही ते खाण्यासाठी सुद्धा जास्त पौष्टिक नसते. हायब्रीड अन्न खाऊन आपल्या शाररीक क्षमतेचा विकास, मानसिक क्षमतेचा विकास होत नाही हे आता विज्ञानानं सिद्ध केले आहे. मात्र जगण्याच्या स्पर्धेत आपण हरवून बसलोय. मात्र पुढील पिढीला अतिशय कुमकुवत करीत आहोत. शाररीक क्षमता नसल्याने मानव आपली पुढील पिढी वाढवू सुद्धा शकणार नाही असे भाकीत होत आहेत.                                                                                                                                                                                                             आपण बारकाईने पाहिल्यास अलीकडील काळात अनेक डाळिंब बागायतदार मधमाश्याच्या पेटांच्या शोधात असतात कारण कि डाळींब असे झाड आहे कि याचे परागीभवन फक मधमाश्याच करू शकतात. जर मधमाश्या नसतील तर डाळिंब फुलांचे रुपांतर फळात होतच नाही कारण याची नर व मादी फुले वेगवेगळी असतात आणि मग मधमाश्या एका फुलामधील नर उचलून मादी फुलावर सोडण्याचे महत्वाचे काम करतात. आणि फक्त माधामाश्याच हे काम करू शकतात, हे आजच्या जगाला समजले आहे. मात्र मधमाश्यांना काय आवडते हे आपण शिकत नाही, तिला पोळे करायला कुठली झाडे आवडतात, पराग व मकरंद गोळा करायला कुठली झाडे आवडतात.                                                                                                                                                                                          आपल्यापैकी बहुतेकजण हिमालयात जातात मात्र हिमलायात मनालीच्या पायथ्याशी अनेक गावे आहेत कि जिथ अगदी २०० वर्षेपूर्वी पासून मधमाशी पालन करीत आहेत, मात्र हे कधीच पाहत नाहीत, खरतर आपल पर्यटन हे शाश्वत व ग्रामीण भागाला उर्जा देणार असले पाहिजे. मात्र असे होताना दिसत नाही. अर्थात मधमाशी पालन २०० वर्षपूर्वी ते पण शास्त्रीयदृष्ट्या पालन केल्याचे आढळून येते. आपल्या राहत्या घरात मधमाश्या पालन करीत आहेत आणि दरवर्षी १० किलो मध विकतात आणि ३ किलो मध स्वतःसाठी ठेवतात. मात्र खरतर हे करण्यापाठीमागे उद्धेश परागीभवन हा असून अनेक पिके यावर अवलंबून आहेत. आणि हे सगळ त्या मधमाश्यांनी सुद्धा स्वीकारले आहे. यात ही माणस त्यांना अति थंडीत गुळाचा व साखरेचा पाक करून ठेवतात काहीजण तर गोळा केलेला मधसुद्धा ठेवतात.                                                                                                                                                                                                 आपल्याला वाटत आपणच शेती करतो मात्र मुंग्या, मधमाश्या, कीटक, गांडुळे, साप, पक्षी असे सर्वच जीव शेतकऱ्याला शेती करण्यासाठी मदत करीत असतात. यात सर्वात आघाडीवर मधमाश्या आहेत हे विसरून चालणार नाही कारण फुलांचे फळात रुपांतर करण्यात मधमाश्या पटाईत असतात, त्यांच्याशिवाय दुसरे किटक हे काम करूच शकत नाहीत, अगदी डाळिंब, काकडी, सफरचंद अशी अतिशय महत्वाची फळे. आपण फक्त जगात मधमाश्या आहेत तोपर्यंतच करू शकतो हे वेळीच जगाने लक्षात घेणे गरजेचे आहे. मधमाश्याची बदलती जीवनशैली यावर अनेक बाबी समोर येत आहेत, यात १९९० मध्ये साध मधमाश्यांच पोळ हे फक्त काटेरी झाडावर बसायची यात साधी बाभूळ, बोर ही झाड महत्वाची होती, मात्र आजच्या काळात हीच पोळी काटेरी झाड सोडून जांभूळ, आंबा अश्या सहज शिकार होईल अश्या झाडांवर शिवाय घरात, भिंतीवर दिसू लागली, हा अतिशय महत्वाचा बदल दिसून येत आहे. हा बदल करण्यापाठीमागे कारण सुद्धा असेच आहे की, आजकाल बोरी व बाभळी तोडण्याचे प्रमाण भयानक वाढत गेले आणि वास्तवात तर आता बोरी व बाभळी दुर्मिळ होत गेल्या, पर्यायाने त्यांनी आपल्या मूळ नैसर्गिक अधिवासात बदल करीत नवे पर्याय स्वीकारला केवळ माणसांच्या चुकामुळेच.. आगी मधमाश्या तर जंगलातील उंच झाड कमी होत गेली शिवाय, नैसर्गिक पाणवठे कमी होत गेले, ज्यात या मधमाश्या सहज मातीत उतरून गाळात पाणी पिऊ शकत होत्या, आता हे पाणवठे नष्ट झालेत, यात काही वन अधिकाऱ्यांनी तर पर्यटकांना वाघ दिसावा म्हणून जंगलातील नैसर्गिक पाणवठे नष्ट केले आणि आता नवीन पाणवठे रोडलगत तयार करून वाघ दिसावा अशी व्यवस्था निर्माण केली. मात्र यात सिमेंटच्या टाक्या बांधल्याने त्यात मधमाश्या पाणी प्यायला उतरतात आणि बुडून मरतात. असे हे व्यवस्थापन कसे जंगल वाढविणार. यात या माश्यांनी आपला नैसर्गिक अधिवास बदलून इमारती, मंदिरे अश्या जागा निवडून लोकवस्तीत प्रवेश केला. कारण पाणी सहज मिळू लागले शिवाय उसाची रसवंती हे सुद्धा महत्वाचे आहे कारण यात त्यांना उन्हाळ्यात गोड रस मिळत असतो. आजकाल शिकलेल्या लोकांना मधमाशी काय करू शकते याच महत्त्व राहिलेले नाही. मात्र शेतीत अडचण आली की मग आपण सर्व पर्याय शोधत असतो. शेतीच्या बांधावर बोर, बाभूळ, जांभूळ, आंबा, शेवगा, भोकर, रुई अशी विविध झाड बांधावर होती. मात्र इतरांचे ऐकून सर्व झाडे तोडली आणि जास्त पाणी पिणारी नारळाची झाडे बांधावर लावली, यात शेतीची जैव विविधता झपाट्याने कमी झाली हे लक्षात आलेच नाही. आता खरी गंमत अशी आहे की, लॉकडाऊन मध्ये अनेक बिझी मित्र free झाले व त्यांचे फोन आले तसाच त्याचा पण फोन आला की, व तो सांगू लागला पॉली हाऊसमध्ये काकडी लावली आहे आणि खूप मोठी पिवळी फुल येत आहेत, आणि जळून जातायेत शिवाय काकडी अंगठ्या एवडीच राहतेय, काय कराव लागेल, म्हणून मी नैसर्गिक शास्वत शेतीचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की या काकडीचे परागीभवन होत नाही कारण या फुलात आत शिरून परागीभवन कोणीही करत नाही, त्यामुळे त्याचे पराग फुटत नाहीत आणि मग फुल जळून जात आहेत, मग यावर उपाय म्हणजे मधमाश्याच जगात हे काम करू शकतात, खटपट करून मधमाश्यांच्या पेट्या आणल्या आणि त्याच रात्री दोन पेट्या पॉली हाऊसच्या तोंडाजवळ ठेवल्या. सकाळी लवकर मधमाश्यांनी आपले परागीभवनाचे काम सुरु केले. मग ७ दिवसांनी १ क्रेटऐवजी आता ६ क्रेट काकड्या तोडल्या आणि शिवाय टवटवीत माल सापडला, २० किलोची वाढ १५ पटीने उत्पन्न वाढले. याचा टक्केवारीत अर्थ काढायचा असेल तर १५०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले.                                                                                                                                                 माझा मित्र सहज म्हणाला शिक्षणात कधी अस शिकवलं जात नाही, यापुढे मात्र पर्यावरण पूरक वृक्षारोपण करणार असल्याचे स्पष्टपणे बोलून दाखविले. अगदी शेतीच्या बांधावर बोरी, बाभळी, करंज, भोकर, उंबर, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ अशी जैव विविधता पूरक झाडे लावणार असे कबूल केले. अनेकजण सांगतात झाडांची सावलीमुळे पिकांना फटका बसतो मात्र हे खोटं असून आपली स्थानिक झाडांच्या पानांचे खतात लवकर रुपांतर होते, शिवाय सावलीमुळे काही फरक पडत नाही, मात्र यात परदेशी निलगिरी, गुलमोहर आणि नारळ झाडे बांधावर असल्यास भूजल पातळी झपाट्याने खोलवर जाते आणि यांची पाने जमिनीवर पडल्यास जमीन नापीक होत असते. त्यामुळे  फक्त स्थानिक झाडेच शेतीच्या बांधावर लावली पाहिजेत. काकडीचे परागीभवन करताना मधमाशी फुलात शिरून परागीभवन करीत असते. आणि मग काकडीचे वेलींची वाढही झपाट्याने होत असते, याचा अर्थ वेलीची वाढ जोरात होते आणि उत्पादन क्षमता वाढते ती पण कित्येक पटीने...काहीजण दिवसा कीटकनाशक फवारतात आणि मग मधमाश्या मारतात. यावर उपाय म्हणजे रात्री मधमाश्यांनी आपले परागीभवन काम थांबविले की फवारणी करावी जर गरज असेल तरच.. अगदी ज्येष्ठ निसर्गतज्ञ मारुती चितमपल्ली यांनी नागझिरा येते सांगितले की, जंगलात अस्वले मधमाश्यांची पोळी व मध आवडीने खातात, त्याच्या भाकरी करतात त्या करताना झाडांची पाने टाकतात आणि मग त्या सर्व भाकरी गुहेत ठेवतात कारण त्यांच्या पिल्लांसाठी उपयोगी येतील, मात्र काहीवेळा या भाकरी चोरायला आदिवासी लोक येतात आणि मग अस्वले हल्ले करतात मात्र अस्वलाचा हल्ला म्हणजे जगात सर्वात वाईट चेहरा होतो, कारण त्याची एक चापट म्हणजे चेहरा विद्रुपीकरणच. मात्र एकदा त्यांनी एक अस्वल झाडावर चढत असल्याचे पहिले, ते झाडावर मधमाशी पोळे खाण्यासाठी झाडाच्या शेंड्यावर गेले आणि वरून खाली पडले आणि मेले याचा अर्थ असा आहे की , त्या मध्यामाश्याच्या पोळ्यावर अनेकदा अस्वल हल्ले झाले होते आणि मग त्या पोळ्यातील राणीने आपल्यात बदल करीत झाड फांदी ऐवजी अस्वल आल्यावर फांदी सहज तुटेल अश्या फांदीवर आपले पोळे केले आणि यावर कायमस्वरूपी आगी माश्यांनी उपयायोजना केली. ज्या प्रजाती बदलायला शिकतात त्याच निसर्गात टिकतात आता वेळ आहे मानवाला बदलायची, जर आपण आपल्या जीवनशैलीत बदल केला नाहीतर आपणसुद्धा संपणार यात शंकाच नाही, हे विशेष लक्षात घेणे आवश्यक आहे.




रविवार, ५ डिसेंबर, २०२१

World soil day

   
Keep soil alive 
Protect soil biodiversity

    आजच्या जागतिक मुदा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। 



आज जागतिक माती दिन !

माती (मृदा) हा अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करण्यासाठी ५ डिसेंबर हा ‘जागतिक मृदा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
                                                                                                                                                                            आज  आपण माती शिवाय काहीच उत्पादित करू शकत नाही .आज जगात खूप शोध लागले मात्र मातीला पर्याय  अजून सापडला नाहीय .आजही कुठले हि पिक उत्पादन  घेण्य साठी माती आवश्यक आहे .आज साधारण आपल्या भागात जमीन हि मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणारी जमीन हि प्रत्येक पिकासाठी आवश्यक आहे .आणि त्या जमिनीचा सामू हा जवळ जवळ जमिनीचा सामू हा ६.५ ते ८ असावा सामू ६ पेक्षा कमी असणार्या जमिनीत पिके हि यात नाहीत ,आज भारतातील जमिनी ह्या हवामान प्रजन्य मन  भोगोलिक परिस्थिती नुसर जमिनी ह्या काळी किवा तांबडी  आढळते . 

जमिनीचे कार्य -;
 १ जमिनीतील सुक्षम जीवांचे संगोपन करणे .
२ पिकांना आवश्यक तेवढा ओलावा निर्माण करून देणे .
३ जमिनीतील अन्नद्रव्यांचे उपयोग पिकांच्या वाढीसाठी व अन्न निर्यातीसाठी करणे .
 ४ मातीतील खनिजे  उपलब्ध करून देणे .

मातीचे महत्व ,
                    मातीचे महत्व खूप आहे .आज आपल्याला माहिती आहे कि विज्ञानामुळे खूप शोध लागले पण मातीला पर्याय नाही मिळाला .म्हणून आज  मातीच्या  एक एक कनाला  महत्व आहे .मातीचा एक कण निर्माण होण्याला हजारो वर्षे लागतात मात्र तोच एक मातीचा कण आपण खूप सहज  नष्ट करत आहे .जमीनीच प्रदूषण करून  .आज आपण मातीत खूप घटक मिसळून  मातीला नापीक प्रदूषित केल आहे .आज जमिनी ह्या क्षार युक्त आणि चोपण झाल्या आहेत मानवाच्या चुका मुळे मानवाने अति उत्पादन घेण्याच्या नादात आज जमिनी ह्या चोपण आणि क्षार युक्त केल्या आहेत .खाते, कीडनाशक  ,तन नाशके ,  अति सिंचन यामुळे जमिनी  जमिनी नापिकी झाल्या आहेत .                                                                                                                                                                         माती संवर्धन  मोहीम ,
                                आज आपल्या सर्वांना गरज आहे ती माती संवर्धन करण्याची मातीचे महत्व सर्वाना नाहीत करून देण्याची .मातीला  सुपीक आणि  उपयोगी बनवण्याची  त्यासाठी आपल्याला मातीला प्रदूषित करणाऱ्या  रासायनिक घटकाच्या  वापरावर बंदी आणून मातीला सुपीक उपयोगी बनवण्य साठी प्रयत्न करण्याची .शेतकरी  यांना     रासायनिक खतला , कीडनाशक , तपनाशक ला पर्यायी  सेंद्रिय  घटक उपलब्ध  करून देणे .           
   
सेंद्रिय शेती ,
                 आज आपण पाहत आहोत कि रासायनिक शेतीतून काय दुषपरिनाम होत आहेत .त्याला  पर्यायी म्हून आज सर्वांनी सेंद्रिय शेती  करणे  फायद्याचे आहे .ते खूप महत्वाचे असून काळाची गरज  आहे .शेंद्रीय पद्धतीने शेती केल्याने मातीचे  संगोपन आणि संवर्धन चांगल्या पद्धतीने होते हे शिध झाले आहे .


      माती हि आजची जननी आहे ,जी असंख्य जीवाला अन्न पाणी पुरवत आहे ,त्यामुळे मातीला वाचवणे गरज नसून आपले कर्तव आहे ,धरणी ला आपण माता मानत आलो आहे ,आज गरज आहे आपण तिला आपल्या आई सारख साभाळ करण्याची .चला तर मग काळजी घेऊ ..

सोमवार, १२ जुलै, २०२१

World paper bag day ..

 World paper bag day 2021 जागतीक कागदी पिशवी दिवस !

प्लास्टिक मुळे होणारे प्रदुषण आणि त्या मुळे नैसर्गिक पर्यावरण यांच्या वर होणारे परिणाम यांचा बद्दल मानव जातीला जागरूक करण्यासाठी जगामध्ये प्रतिवर्षी १२जुलै हा दिवस  जागतिक पातळीवर World paper bag day ! म्हणून साजरा करतात.

प्लास्टिक कचरा नष्ट होण्याला सडाला .हजारो वर्ष लागतात . त्यामुळे सिंगल युज प्लास्टिक बागेमुळे होणारे दुष्परिणाम आपल्याला माहीत असायलाच पाहिजेत.
प्लास्टिक कचरा मुळे होणारे प्रदुषण आणि परिणाम आपल्याला माहीत असायलाच हवे.
* जल
*जमिन
*वायु
*तापमान
*प्राणी पक्षी वनस्पती आणि किटक
*मनुष्य 
*रासायनिक दुष्परिणाम
प्लास्टिक चार वापर म्हणजे भावी पिढी साठी गळफास लावून ठेवणे होय जो त्या वापर करून आपण स्वतः आवळत चालला आहे.

पर्यावरण आणि मानव व सर्व सजीव सृष्टी चया आरोग्य स  हाणिकार ठरलेल्या प्लास्टिक चार वापर  आजही धुमधडाक्यात व खुलेआम सुरू आहे त्या चे ना प्रशासनाला ना नागरिकांना भान हरपून गेले आहे.
कायदा करून ३५ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि तरि पण् कोणालाही काही गैर वाटत नाही  १९८६ ते आज पर्यंत ४  वेळी कायदा करून दिला आहे  ४० मायकौन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वर बंदी घातली आहे ( स्वच्छ भारत'  अभिमान ) स्वच्छ शहर, गाव. स्पर्धा हे कशासाठी करतेय शासन हे अजून ही आपल्या लक्षात येते ना हीय .
प्लास्टिक जप्त करण्यात आल्या मोहीम राबविण्यात आल्या होत्या त्या वेगाने त्या थांब वली जाते राजकारण केले जात आहे थट्टा करून दिला आहे त्या मुळे नैसर्गिक पर्यावरण यांच्या इतर अनेक परिणाम होतो हे अजून ही आपल्या लक्षात येत नाही  
आज भाजी विक्रेते फळ वाला. किराणा दुकान, होटेल , मटणाचे दुकान खाद्यपदार्थ औषधे आदी . सर्व च  ठिकाणी पातळ व कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापर सर्रास सुरू आहे याच प्लास्टिक पिशव्या मधुन टाकाऊ  अन्न वा वस्तू लोक फेकून दिले जाते. रस्ते मोकळे जागा मैदानावर सावजणीक ठिकाणी बस स्थानक परिसरात बाग मंदिर शाळा दवाखाने रुग्णालये परीसरात तलाव नद्या नाले ओढे पार या ठिकाणी तर लोकांच्या निष्काळजीपणा कळस गाठला आहे  म्हणून आपण जागतिक पातळीवर स्वच्छता यादी मध्ये १३१ नंबर आहे . आपल्या कडे लोकांच्या निष्काळजीपणा रोज गाडंन मैदानावर येणारे लोकं हे सर्रास जागेवर च प्लास्टिक कचरा पिशवी बाटली शिवा सोडून निघून जातात . त्या ठिकाणी कचरा कुंडी असताना त्यात कोणीही टाकत नाही . खरं तर ही सवय आहे स्वच्छ हातांची,स्वच्छ मनाची माणुसकी म्हणजे भावी पिढी काय शिकावे ?  
रस्ता वरही हीच परिस्थिती लोकांच्या निष्काळजीपणा रोज सकाळी ओळख करून देतात . त्या चा परीणाम मानवी जीवन आरोग्य तसेच प्राणी पक्षी वनस्पती किटक  यांवर गंभीर परिणाम होतो यात त्या चे जिवीत हानी होते.
इतर् फेकले प्लास्टिक पिशव्या गाय,म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या कोंबड्या व इतर अनेक प्राणी पक्षी त्या खात्यांत . प्लास्टिक पिशव्या मधील वस्तू नष्ट होतात.पण प्लास्टिक नष्ट होत नाही. त्यामुळे हेच प्लास्टिक  प्राणी पक्षी कीटक पोटात अडकून राहते. त्यामुळे यांचा जिवन धोका निर्माण होऊ शकतो. असे अनेकदा घशात अथवा सवशन नलीकेत अडकुन प्राणी  मुत होतो . जमिनीत अथवा पाण्यात असले तरी प्लास्टिक पिशव्या नष्ट होत नाही. प्लास्टिक जाळले तर हवे चे प्रदुषण होते. प्लास्टिक मद्ये विविध घातक रसायने असतात.  ते मानवाच्या कातडीला ते धोकादायक ठरू शकते. जमिन नापिकी बनतात . पाण्यात ही रासायनिक घटक वाढत आहे. केंद्रीय सरकार ने ३५  वर्ष  पुवि पर्यावरण संरक्षणासाठी अधिनियम १९८६ व महाराष्ट्र शासन प्रदुषण महामंडळ स्थापन केले व त्या अन्वये शासनाने ४० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वस्तू सर्व प्रकारच्या प्लास्टिक वर बंदी घातली आहे तरी त्याची निर्मिती व विक्री धडाक्यात सुरू आहे.केवळ महाराष्ट्र राज्य नव्हे तर केरळ पासून ते कश्मीर पर्यंत हेच सुरू आहे.आज गरज आहे ती आपण सर्व मिळून प्लास्टिक कचरा पिशवी बाटली चा वापर कमी करायची . त्यासाठी आपण स्वतः मनापासून प्रयत्न केले पाहिजेत.आज काही सुज्ञ नागरिक कृती करित आहे.मि प्लास्टिक पिशव्या वापर करणार नाही अशी भूमिका घेतली पाहिजे. प्लास्टिक पिशव्या घेऊ नका देऊ नका. प्लास्टिक ला पर्याय उपलब्ध आहेत. त्या चा वापर करून आपण प्लास्टिक चा वापर कमी करू शकतो. 

त्यामुळे आपण शपथ घेऊन
!एकच ध्यास ठेवूया, प्लास्टिक पिशव्या हटवुया.
        समूधद पर्यावरण रक्षण करुया.!!

आजच्या दिवसाची शुरुवात व इतिहास...
सन.१८५२मधे अमेरिकेत शास्त्रज्ञ फ्रान्सिस व्हाले  यांनी पेपर पासून पिशवी बनवण्याची पद्धत मशिन बनविली .होती तसेच the mother of the glossary bags म्हणून ओळखली जाणारी मार्गारेट इ नाईट यांनी किराणा मालाच्या पिशवी चा आविष्कार केला होता. तेव्हा त्यांनी paper bag चा प्रचार व प्रसार केला तेव्हा पासून सर्व जगात १२  जुलै  हा दिवस जागतिक पातळीवर" World paper bag day "म्हणून साजरा करतात.
 
Paper bag uses..
#Paper bag हि पुर्ण पणे लाकडाच्या पासून पिशवी बनवण्यात आली असल्याने पर्यावरणासाठी अनुकूल आहे.
#paper bag बयोडिगेडेबल (जैविक घटकांनी बनलेली ) असल्याने विषारी पदार्थ तयार करता नाही 
#paper bag चा पुन्हा पुन्हा वापरता येते तसेच या पासून कंपोस्ट खत तयार होते
#ईधन म्हणून ही वापर केला जातो आहे.

Paper bag disadvantages.....
#paper bag हा घटक लाकडाच्या पासून बनविला जातो.. त्यामुळे लाखो झाडे कत्तल करण्यात येत आहे.
# द्रव्य मान ,थंड ,जड पदार्थ  साठी वापर करण कठीण आहे..
प्लास्टिक आणि थमाकौल  वापर विक्री करतात आढळून 
आल्यास होणारे शिक्षा व दंड

प्रथम गुन्हा केल्यास---५००० दंड
दुसऱ्या दा गुन्हा-------+१०००० दंड
तिसऱ्या दा गुन्हा केल्यास --२५००० दंड आणि ३महिने कारागृहात रवानगी करण्यात येत
      
                " Save earth save life "

Featured post

चिकुनगुनियामुळे होणारी गंभीर लक्षणे ,

  चिकनगुनिया हा आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील डासांद्वारे मानवांमध्ये पसरणारा रोग आहे; इतर क्षेत्रांमध्ये तुरळक उद्रेक नोंदवले गेले आहेत. डे...