शुक्रवार, १५ जुलै, २०२२

प्रदूषणाच्या गंभीर समस्या .

नमस्कार ,

              आज आपण या पेज वर एक नवीन विषय घेऊन येत आहेत ,हा विषय म्हणजे प्रदूषण हा विषय आपल्या सर्वानसाठी नवीन नाही परंतु त्या बदल आपणास याची गांभीर्य किती.आहे ते आपणास आज कालच्या  बातम्या आणि समस्या एकून कळाल असेल.                                                                                  आज आपल्या समोर प्रदुषणाच्या खूप समस्या आहेत. जस कि जमीनीच प्रदूषण ,जल प्रदूषण ,ध्वनी प्रदूषण , वायू प्रदूषण ,कचऱ्याच्या समस्या ,जैव्विव्धेतेचा ऱ्यासओधोगिक प्रदूषण असे बरेच पर्दुषण आहेत त्यावर आपण चर्चा करणार आपल्याला माहित आहे .कि प्रदूषण हे दोन प्रकारे होते  ते म्हणजे ,नैसर्गिक प्रदूषण ,मानवनिर्मित प्रदूषण  नैसर्गिक प्रदूषण हे निसर्गातील घडामोडी मुळे होत असते .आणि त्याचे परिणाम हे खूप लवकर होतात जशे कि  ज्वालामुखी च्या उद्रेकातून होणारे प्रदूषण , चक्रीवादळ,वावटळ , जंगलातील आगी .वाळवंटातील धूर, महापुरे, , दुष्काळ ,अति ,पाऊस  नैसार्गिग साथरोग , असे बरेच कारणाने सुद्धा प्रदूषण होते .मात्र याची तीव्रता जरी जास्त असली तरी परिणाम मात्र जास्त नसतो या उलट मानवनिर्मित प्रदूषण हे खूप घातक आहेत ,ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहे. प्लास्टिकच्या मुळे वाढलेलं प्रदूषण आजच्या घडीला खूप प्रदूषणाला मदत करत आहे .                                                                                                                   जल ,वायू,तापमान ,जमीनीच प्रदूषण ,पूर , पर्यावरणाचा होत चाललेला रह्यास.या सगळ्याच कारण आज प्लास्टिक असल्याने आता कोठे सरकारने त्यावर बंदी सन आणली आहे .वास्तविक हि बंदी खूप आधी कराला पाहिजेत होती. असो झाली हे महत्वाच या वर जर आधी काही गांभीर्याने पावूल उचले असते तर कदाचित आजची परस्थिती काही वेगळी असती.

 सन २००४ मध्ये उपग्रहाद्वारे घेतल्या गेलेल्या छायाचित्रात गंगेच्या खोऱ्याभोवती धूर आणि धुक्याचा जाड थर दिसून आला.तेव्हा लोकांनी एक अंदाज काढला गेला कि वायव्य भारतात जाळल्या गेलेल्या लाकडामुळे या भागात मोठ्या प्रमाणात धुराचा थर पसरला असावा .असा अंदाज होता .पाकिस्तानच्या आणि मध्यपूर्वेतील वळवाळवंटातील धूळ हि या थरात मिसळलेली होती .उतरं भारतात होत असलेले हवेचे प्रदूषण हे या मागचे प्रमुख कारण होते .                                                                                                                                धूळ धूर व धुके यांच्या मिश्रनातून  तयार होणारे .धूरके हे हानिकारक असते .७०० वर्षा पूर्वी लंडन मध्ये स्मॉग ने ४००० हजार लोकांचे बळी घेतले होते .सन २००५ मध्ये घेण्यात आलेल्या छायाचित्र तून घनकचर्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात दुषित होत असल्याचे लक्षात आले .हवेचे प्रदूषण जल प्रदूषण कचरा आणि नैसर्गिक पर्यावरणाचे प्रदूषण हि भारतासमोरी आपल्या समोरील  समस्या आहेत .भारतात मागील काही वर्षाचा विचार जर केला तर असे लक्षात येते कि सन १९४७ते १९९५ या कालावधीत पर्यावरणाचे प्रदूषण अधिकाधिक होत गेले असे पहावयास मिळेल .मात्र त्या नंतर जागतिक बँकेच्या तज्ञांनी केकेल्या सर्वेक्षण नुसार असे लक्षात आले कि १९९५ ते २०१० या कालावधीत जगात सर्वाधिक वेगाने भारताने पर्यावरनिय समस्यांशी मुकाबला करून पर्यावरणीय दर्जा सुधारला मात्र तरीही प्रदूषण भारतासमोरील मोठे आव्हान अजून मोठ रूप घेताना दिसत आहे .आता झालेल्या २०२१ च्या जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या प्रदूषण   यादीमध्ये भारताच्या राजधानी आणि १० प्रमुख शेहरसारखे  शेहरे पहिल्या १० मध्ये ३ आपल्या भारतातील होते . पर्यावरण बिघडल्यामुळे विविध प्रकारचे आजार होत असून आरोग्याच्या अन्य समस्याही निर्माण होत आहेत .

महात्मा गांधींच्या संदेशाकडे दुर्लक्ष ..

भारतात प्रदूषणाची एवढी गंभीर परिस्थिती पूर्वी नव्हती .आपला देश मूळ कृषिप्रधान आहे .पण शेतीला सर्वाधिक महत्व न देता आपण कारखानदारीला महत्व दिले.' खेडी स्वयंपूर्ण बनवा ' या महात्मा गांधींच्या संदेशाकडे साफ दुर्लक्ष करून  ग्रामीण भागाकडे पूर्ण दुर्लक्ष करून भागाचा

 विकास आपण करू लागलो .शेतीकडे दुर्लक्ष झाले .आणि कारखान्दारीतील नोकरीला महत्व आले .कारखाने उभारला हवे होते मात्र ते पर्यावरणाला त्रासदायक न ठरणारे म्हणजेच पर्यावरण पूरक असायला हवेत .या कडे काटेकोरपणे लक्ष द्यायला हवे होते .मात्र तसे काही झाले नाही .पर्यावरण विषयक कायदे हि  प्रसंगी धाब्यावर बसवून आपण आपल्या सोयी साठी पर्यावरणाचा आणि इतर सजीवांचा जीव घेतला .                                                                         आज आपण जागतिक तापमानवाढीचा परिणाम भोगत आहे .चटके आज आपण सोसत आहोत .हे असेच राहिले तर आपण या पृथ्वीला नष्ट केल्या शिवाय शांत बसणार नाहीत . आज आपल्या प्रत्येक नैसर्गिक स्त्रोतांचे प्रदूषण होत आहे . काळजी घ्या . 

गुरुवार, १४ जुलै, २०२२

पूर महापूर

 पूर महापूर आजच्या घडीला आपल्या समोर आलेल एक नैसर्गिक संकट .संकट जरी नैसर्गिक असाल तरी त्याला कारणीभूत आपण आहे .ते कस आपण  या ब्लोग मध्ये कळेल . पूर महापूर म्हटल कि आपल्या डोळ्या समोर येतो  नदी,नाले पाण्याने तुतुंब भरून वाहत असलेले नदी पात्र नदीला पूर हा दरवर्षी आपल्याला पाहला मिळतोच .दरवर्षी भारतात पूर महापुरामुळे हजारो लोक आपला जीव गमावत असतात .सर्वात जास्त जीवित हानी हि नदी काठच्या समुद्राच्या काठच्या लोकांना बसत असतो .

पूर महापूर येण्याची कारणे ?

१ धरण तलाव भरल्याने तेथील पाणी बाहेर सोडल्याने नदीला पूर येतात .

२ समुद्रात भूकंप ,सुनामी आल्याने ठेथिल पाणी बाहेर येऊन नद्यांना पूर येतात .

३ हिम सखालन बर्फ वितळून जवळच्या नद्यांना पूर येतात .

४  ढग फुटी झाल्याने जास्त तर आपल्याकडील नद्यांना पूर येतात .

५  सतत  मुसळधार  पाऊस आल्याने जास्त तर आपल्या कडील नद्यांना पूर येतात .  

अपघाताने काही नद्यांना महापूर येतात ,धरण तलाव फुटल्याने नद्यांना पूर येतात .असे बरेच कारणाने  नद्यांना पूर येत असतात .

या सर्व कारणांचा विचार जर केला तर काही कारणाना आपण जबाबदार आहे , आज आपल्याला माहित आहे कि पूर महापूर आधी पण येत होते मात्र त्यामध्ये जीवित हानी एवढी होत नसे .कारण त्याकाळी कोणी आपल्या फायद्या साठी जमिनी जंगल नद्या यांचा आपल्या फायद्यासाठी वापर करत नसे . 

आज आपण आपल्या फायद्यासाठी नद्याचा वापर करून घेत आहे .आज नद्या हे वेवसाय  मध्यम बनले आहे .रेती मुरूम ,गाळ ,दगड ,आज नद्यान मधून उपसणे चालू आहे .उपसण्याला काही मर्यादा असतात .मात्र आज त्या कोणी  पाळत नाही ,जंगल तोड , खनिज खाणकाम जोरात चालू आहे . तसेच मानवच झालेलं नद्या वरच अतिक्रमण  यामुळे हि आजकाल पुरे जास्त प्रमाणात येत आहेत .आज आपण जर कोल्हापूर .सांगली .मिरज ,कोकण  नातील काही जिल्हे  आणि विदर्भ  तील  गडचिरोली ,भंडारा ,गोंदिया ,चंद्रपूर ,आणि वर्धा ,या जिल्हातील पुरांचा  विचार केला तर आपल्याला लक्षात येईल कि हे सर्व जिल्हे ,खानिजनी भरलेले  जिल्हे आहेत . या जिल्ह्यांचा विचार जर केला तर आपल्याला कळेल कि या जिल्ह्यात जंगल , खनिज साठे मोठ्या प्रमाणात आहेत .आणि आता त्या ठिकाणी  खनिज खोद्कन आणि जंगल तोड हि मोठ्या प्रमाणात होत असल्याने .जंगल जमिनी ह्या पाण्याला जास्त वेळ थांबू शकत नाहीत त्यामुळे पावसाच पडलेल पाणी जमिनीत मुरण्या आधीच  वाहून जात आहे .मोठ्या प्रमाणात जंगल तोड आणि खनिजांचा उपसा यामुळे पाणी थांबला जागा राहिल्या नाहीत . पूर्वी जंगल खूप घनदाट असत त्यामुळे पावसाच पाणी झाडावर पडून ते जमिनीत मुरात असे ,आणि जमिनी ह्या झाड आणि माती घाट  धरून ठेवल्याने  माती वाहून जात नव्हती त्यामुळे  पाणी हे जमिनीत मुरात असे .मात्र आज हि अवस्था झाली कि  नदी आणि जंगल हे मानवाच्या हस्तक शपामुळे  अधिसारख्या पाण्याला साठवण्यात असमर्थ ठरत आहेत .आज बहुतेक नद्या ह्या मातीने गळल्या गेल्या आहेत त्यामुळे त्या पाणी मुरण्यास असमर्थ ठरत आहेत .जंगल तोडीमुळे माती हि मोठ्या प्रमाणात वाहून येवून नदी खोली कमी झाली आहे त्यामुळे ,आज पडलेल पाणी साठवला जागा राहिली नाही . तसेच आज मानवाने जागेच्या हवेसाठी नदी काठावर घरे बंधली आहेत . नद्याच नैसर्गिक  अस्तित्व राहील नाही .त्यामुळे आज नद्यांना महापूर पूर येत आहेत .वाढत शहरी करण   हेही काही प्रमाणात पुराना कारणी भूत आहे .आज मोठमोठ्या सह्रापासून ते लहान गावात हि  विकासाच्या नावावर जी पर्यावरनाची  हानी करणे चालवली आहे ती .जसे आज प्रत्येक शहरात कॉन्क्रीट  बांधकामे झाली आहेत .त्यामुळे पडलेला पाऊस हा जमिनीत मुरला जात नाही . त्यामुळे पाऊस पडला कि ते पाणी थेट नदी ला जाऊन भेटते त्यामुळे पाण्याला मुरला जागा न मिळाल्याने ते नदी मध्ये येते,आता पाऊस पडला कि लगेच नदीत जाते .                                                                                             मात्र आधी अस होत नसे पाऊस पडला कि किमान २४ तास तरी लागत असे पाणी नदीला जायला त्यामुळे नदीत पाणी विसर्ग होत असे त्यामुळे नद्यांना जास्त पाणी येत नसे  त्यामुळे पूर जरी अला तरी त्याची तीव्रता  कमी असे ,त्यामुळे जीवित हानी काही होत नव्हती तसेच आधी चे लोक हे नदीपासून दूर आणि उंच ठिकाणी राहत असत त्यामुळे पुरामुळे जीव जाने हे होत नसे . आता मात्र पूर्वी सारख जीवन रहल नाही माणूस हा फायद्या साठी काही कराला तयार आहे .त्यासाठी जीव गेला तरी चालेल ..आता गरज आहे आपण परत ते दिवस आणून निसर्ग आणि माणूस एकत्र राहण्यासाठी प्रयत्न करण्याची चला तर मग करू प्रयत्न ..

रविवार, १० जुलै, २०२२

वायू प्रदूषण

 वायू  प्रदूषण 

आजच्या घडीला सर्वात जास्त त्रास होत असलेल प्रदूषण म्हणजे वायू प्रदूषण .आज आपण भारताच्या सर्वात मोठ्या शहराची आज काय अवस्था झाली आपल्याला सांगायची गरज नाहीय .दिल्ही , मुंबई ,कोलकाता ,मद्रास , गुड गाव ,या शहरातील आज हवा कशी आहे .आणि तेथील लोक कसे सहन करतात हे आपल्याला माहित आहे .                                                                                             वायू प्रदूषण हे आज सर्वात जास्त जर होत असेल तर ते वाहणा मुळे आणि औधोगिक करणातून निघणार्या धुरा मुळे होते .तसेच ग्रामीण भागात गोवर्या /सेणी लाकूड आणि कचरा यांचा इंधन म्हणून वापर केला जातो .आजही भारतातील ग्रामीण भागात सुमारे दहा कोटी लोक रोजच अशा प्रकारचे इंधन चुली मध्ये वापरतात असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे .वायू प्रदूषणाचे हे एक प्रमुख कारण आहे .यामुळे कोळशाच्या पाच पट अधिक धूर या पासून निर्माण होतो .                                                                                                                          या शिवाय वाहनामधून निघणारा धूर आणि कारखान्यातून बाहेर पडणारा धूर यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते .उर्जेसाठी मोठ्या प्रमाणात  लाकूड ,शेतातील टाकाऊ कचरा वापरणारा भारत हा जगातील सर्वाधिक मोठा देश आहे .आजही अक्टोबर ते डिसेंबर या काळात वायव्य भारत आणि उतरं भारत येथे मोठ्या प्रमाणात पिके जाळली जातात .त्याचाच परिणाम आज दिल्ही गुडगाव  भोगत आहेत ,आज दिल्ही  मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण कमी करण्यावर पैसे खर्च करत आहे , आजही  त्या भागात उघड्यावर सुमारे ५० कोटीटन एवढा कचरा जाळला जातो .त्यातूनच पंजाब ,दिल्ही आणि पश्चिम बंगाल मधील नद्या च्या काठावर मोठ्या प्रमाणात धुके धूर आणि प्रदूषण युक्त हवेचा थर निर्माण झालेचे आढळते .                                                                             शहरी भागात वाहने आणि कारखाने हीच प्रदूषणाची महत्वाची कारणे आहेत .प्रदूषणामुळे आजही भारतात तीन लाख लोक अकाली मुत्यु मुखी पडत आहेत .जगातील सर्वात प्रदूषण युक्त शहरामध्ये भारताची ५ शहरे येतात . आणि जगातील दह देशामध्ये भारताचा क्रमांक लागतो .आज भारतात शहरीकरण आणि औधोगीकरण यांमुळे भारताच्या हवामानाचा दर्जा ढासळला आहे .                                                                                                                                                                 जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार गुडगाव दिल्ही हे सर्वाधिक प्रदूषण युक्त दहा शहरातील एक शहर आहे .वायू प्रदूषणाने आज दिल्ही तील  स्वशन आणि त्वचा विकार वाढला आहे .दिल्हीत स्मॉग मुळे श्वासण  विकाराचे रुग्ण खूप वाढले आहेत .त्यामुळे तेथील सरकारला वेळोवेळी उपाययोजना कराव्या लागतात आज दिल्ही तील सर्वात जास्त सरकारला पैसा हा हवेचे प्रदूषण कमी करण्यावर खर्च करावा लागत आहे .गेल्या वीस वर्षात वाहनामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रमाणात आठ पटीने वाढ झाली आहे .त्याच मुळे आज केंद्र सरकारला वाहनाच्या क्र्याब धोरनाला लागू कराव लागल .आज आपण वायू प्रदूषण हे फक्त वाहन पासून च नाही तर आपल्या घरातून सुद्धा मोठ्या प्रमाणात करत असतो .घरातील कचरा  प्लास्टिक जाळून आपण हवेचे प्रदूषण करत असतो .आज आपल्याला माहित आहे कि .प्लास्टिक जाळल्याने खूप घटक रसायने बाहेर पडतात तरी आपण ते जळत असतो . आज जवळ पास सर्वच शहर हे आपला कचरा जळतात इंदोर आणि एक दोन शहरे सोडली तर कोठेच कचर्याचे वर्गीकरण करून विलेवाट लावली जात नाही .खर तर आपण आपल्या घरा पासून कचर्याची वर्गीकरण करून विलेवाट लावली पाहिजेत .आजच्या प्रत्येक घरात रोजच कचरा  तयार होतो .जर आपण आपल्या कचर्याची आपणच वर्गीकरण करून विलेवाट लावली तर .जसे ओला कचरा हा आपण गांडूळ ,कॉम्पोस्ट ,नाडेप.खत तयार केल तर आणि इतर निघणारा घन कचरा परत रीसायकलिंग  करिता द्यायचा .त्याने प्रदूषणाला आळा बसणार हे नक्की ,असे खूप छोटी कामे आहेत ,ज्यातून आपण प्रदूषण होण्या पासून रोखू शकतो गरज आहे ते आपण अमलात आणण्याची .













शनिवार, ९ जुलै, २०२२

औधोगीकरणामुळे वाढते प्रदूषण ?

 औधोगीकरणामुळे वाढते प्रदूषण ?
  
वाढती लोकसंख्या हा आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे .ग्रामीण भागातून शहराकडे होणाऱ्या प्रचंड स्थलांतर यामुळे शहराच्या यंत्रणेवर आणि अर्थ कारणावर मोठाच बोजा पडतो .या लोकसंखेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि रोजगारासाठी दिवसंदिवस कारखाने आणि उधोगांची संख्या वाढत आहे .उर्जा निर्मितीसाठी वापरल्या जाणार्या कोळशामुळे देशाची उर्जेची निम्याहून गरज भागते .त्यापैकी दोन तृतीयांश उर्जा हो उधोग धंदे यात वापरण्यात येते .कोळशाच्या राखेमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते .                                                                                                                                                  गेल्या ४० वर्षात त्यामुळे कार्बन उत्सर्जनाच्या आणि मिथेन सारख्या हरीतगुह  वायूच्या (ग्रीन हाउस  गैसेसच्या ) प्रमाणात ९ पट वाढ झाली आहे .कार्बन उत्सर्जन जर थांबवायचे असेल तर विजेचा वापर कमी करावा लागेल गरज असेल तरच वीज  विजेवर चालणारे उपकरणे वापरावे लागतील तरच कार्बन उत्सर्जन कमी होईल .नाहीतर आपल्याला कोळशाला पर्याय  शोधावा लागेल .विजेचे नवीन सोर्स शोधावे लागतील .सोलर .वाटर .पवन उर्जा  निर्मित  यावर किवा बायो गस  निर्मितीतून वीज निर्मित करावी लागेल .त्यामुळे .आपण कार्बन उत्सर्जन कमी करू .तसेच विजेचा होणारा  वापर हा काही कमी करावा लागेल .त्यामुळे कार्बन मुळे होणारे प्रदूषण कमी होईल .                                                                                                                                                            दुसरा महत्वाचा प्रदूषक वायू म्हणजे  मिथेन वायू हा वायू आजच्या खूप मोठ्या समस्या निर्माण करत आहे .तापमान वाढ हि एक समस्या यामुळे होत आहे .जगातील प्रमुख मिथेन उत्सर्जन करणाऱ्या देशाच्या यादी मध्ये भारत हा ३ स्थानी आहे जगातील दुध उत्पादन करणारे म्हणजे पशुधन असणारे देश हे सध्याच्या मिथेन उत्सर्जन निर्मित  कारणीभूत ठरत आहेत .मिथेन गैस हा आपल्या कडील शेन या पासून निर्मित होत आहे .आधी हा गैस आपण कारखाने या मध्ये उत्पादन करत होतो .मात्र आता हा गैस नैसर्गिक पाने तयार होत आहे .ग्रामिन भागत आजही जनावराचे माल मुत्र आपण उघड्यावर फेकून देतो .त्यामुळे त्यामधून निर्माण होणारा मिथेन गैस हा वातावरणात मिसळून आज तापमान वाढीला तसेच अनेक समस्यांना पूरक ठरत आहे . जनावराचे माल मुत्र जर आपण वेवस्थित खड्यात टाकले आणि झाकून ठेवले तर त्याचे खतात रुपांतर होऊन चांगले खत मिळेल .जर आपण असे नाही केल तर त्याचा परिणाम आपण आज भोगत आहोत .आहेत .रोगराई तापमान वाढ ,कचरा ,प्रदूषण ,डास ,झुरळ उंदीर ,जनावरे यांच्या मार्फत रोगराई पसरणार आणि आपण ते पसरू देणार .                                                                                            काय मग आज पासून करणार न मग ह्या दोन गोष्ठी , वीज कमी वापरणार , जणावरचे मल मुत्र खड्यात टाकणार आणि प्रदूषण कमी करणार .तर आज आपण औधोगिक करणामुळे होणारे प्रदूषण जसे कार्बन आणि मिथेन मुळे होणारे प्रदूषण यावर माहिती घेतली .आणि प्रदूषण कमी करण्यासाठी काय करावे यावर चर्चा केली मग आज पासून आपण या सर्व गोष्टी वर विचार करणार ..तर आपण प्रदूषण या विषयाला  समजून घेणार. 






thanks to ..

शुक्रवार, ८ जुलै, २०२२

भारतीय सण उत्सव आणि प्रदूषण ?


आज आपण भारतीय सण उत्सव आणि प्रदूषण या विषयावर काही चर्चा करणार आहोत .भारत हा सर्वधर्मसमभाव आणि अनेक धर्म मिळून बनलेला .देश आहे त्यामुळे आपण जास्त खोलवर न जाता वर वर माहिती घेऊ फक्त आपणास माहित होण्या करिता जसे कि आपणास माहित आहे .                                                                    कि आपण भारतात जवळजवळ प्रत्येक  महिन्यात ५ सण साजरे करत असतो .पूर्ण भारत भर हे साजरे होत असतात प्रत्येक सन जर विचार केला तर आपल्यायला माहित आहे .कि आज काल आपण सन साजरे करताना पर्यावरण आणि प्रदूषण या गोष्टी ला जास्त महत्व देत नाही .कारण आपण जास्त महत्व हे सण साजरे करण्याला देत असतो .आधी काळी सर्व सण हे पर्यावरण पूरक सण असत मात्र आजकालचे सण हे पर्यावरण पूरक राहिले नाहीत .                                                                                                                                                                                        आज आपण खूप लहान लहान गोष्ठी पण पर्यावरणाला हानी पोहचवतात जसे कि दिवाळी आज आपण दिवाळी साजरी करतो .मात्र त्याच बरोबर आपण पर्यावरणाचा प्रदूषण नाला हातभार लावत असतो .या मध्ये सर्व प्रकारचे प्रदूषण येतील .जल जमीन वायू ध्वनी कचरा असे बरेच प्रदूषण आपण या सण उत्सवातून निर्माण करत असतो ,फक्त दिवाळीच सण नाहीतर प्रत्येक सणातून पर्यावरण प्रदूषण होत आहे आज . ते सण  कोणतेही असो .पूर्वी  सण साजरे होत मात्र ते सण सर्व पर्यावरन पूरक असत .त्यामध्ये पर्यावरन आणि निसर्ग याची काळजी घेतली जात असे .                                                                                                                                                                                                              आज आपण वाढदिवस पासून ते लागण  विधी पर्यंत सर्व कार्याक्रमात कचरा प्रदूषण करत असतो .आपण आताचे सर्व सन हे फक्त देखाव्य साठी करत असल्याने आपण पर्यावरण प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत आहे . अधिकाळी सण साजरे होत .त्यामध्ये निसग पूजन होत असे आणि मग सण साजरे होत असत .मग तो सण कोणताही असो त्यामध्ये निसर्ग पूजन होत असे वाढदिवस असो कि लगण किवा अंत्यविधी या मध्ये प्रथम प्राधान्य हे निसर्गाला दिले जात असे आज आपण ज्या चाली रिती प्रमाने सण साजरे करतो ते आधी पण हो त होते मात्र आपण आता ते सन आपल्या सोई प्रमाणे साजरे करत आहे .त्यामुळे आपण आपल्या सोई साठी निसर्ग पर्यावरण याचा जीव घेत आहोत .आजही ते पूर्वी सारखे सण साजरे करता येतात मात्र आपली तयारी नाहीय कष्ट  करण्याची आज आपल्याला सर्व रेडीमेड पाहिजेत म्हणून आज आपण आपल्या सोई मुळे पर्यावरणाला गमावत  आहे .                                                                                                                                                                                             वेळ अजून हि गेली नाहीय गजर आहे आपण आपल्यात थोडा बदल आणि कष्ट करण्याची चला तर मग या वर्षी पासून आपण सर्व एक निश्चय करू पर्यावरण पूरक सण साजरे करू .निसर्ग सजीव यांना त्यांच्या मनाप्रमाणे जीवन जगू देऊ .

































































































कचरा

 आज आपण कचरा या विषयावर चर्चा करणार आहोत .कचरा शब्द बोलताना आपणास घन वाटत असेल पण आपण जेव्हा करतो तेवा .आपणास काही वाटत नसेल आपणच करणार आणि बोलणार आजच्या घडीला आपल्या सर्व समोर हि एक खूप मोठी समस्या आहे .ती म्हणजे कचरा.                                                                                                                   आज  भारतातील शहरामध्ये दरवर्षी दहा कोटी टनाहून अधिक घन कचरा निर्मित होतो .आज प्रत्येक ठिकाणी गाव असो कि शहर  कचरा हा पहावयास मिळतोच ठिकठिकाणी कचर्याचे ढीग साचून राहिले असताना .                                                                                                                                                               सन २००० मध्ये सर्वोच न्यायालय याने दिलेले कचरा व्यावस्थापनाचे आदेश आपण धाब्यावर बसवले आहेत .नियम कोणी पळत नाही .आज कोणी कोठेही कचरा करताना दिसत आहे आणि लोकांना त्यादल काही वाटत नही . कचर्याचे रिसायकलिंग करणे आवश्यक असताना केले जात नाही .सुमारे ४० टक्के कचरा उचललाच जात नाही महानगर पालिका ,ग्राम पंचायत ,नगर परिषद या बदल काही नियम उपाय योजना करताना दिसत नाहीत .त्यामुळे लोकांना याच काहीच वाटत नाही .ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशान अंड डेव्हलपमेंट च्या  अभ्यासातून स्पष्ट झाले आहे कि वैधकीय कचऱ्याविषयी  कायदे आणि नियम निर्बंध असतानाही ते पाळले जात नाहीत .एका अभ्यासानुसार भारतातील सामारे निम्मा वैधकीय  कचरा सरळसरळ इतरत्र कचऱ्यात फेकला जातो.                                                                                            आज प्रत्येक जिल्यात मेडिकल वेस्ट बाबत समिती आहे .वेस्ट मानेज्मेंट करण्याकरिता .मात्र ते काही करताना दिसत नाहीत .ते फक्त त्यांचा फायदा पाहतात आणि कामे करतात .                                                                                                                          आज मोठ्या प्रमाणावर कचरा डेपोमधून ग्रीन हाउस वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतो .माशा ,डास,झुरळे,उंदीर आणि इतर प्राण्यामुळे तिथून मोठ्या प्रमाणात रोगराई पसरते .सन २०११ मध्ये कचऱ्या पासून उर्जानिर्मिती चे प्रकल्प कित्येक शहरात उभारण्यात आले आहेत .तरीही कचरा हा प्रश्न सुटलेला नाही .गरज आहे आपण ठरवण्याची.



जल प्रदूषण

जल प्रदूषण हि आजच्या घडीला खूप महत्वाची समस्या आपल्या समोर आहे .कारण पाण्या वाचून आपण सजीव राहू शकत नाही .                                                              जल प्रदूषण म्हणजे पाणी पिण्यासाठी उपयुक्त न राहणे ,त्यातील प्राणवायू प्रमाण कमी होणे म्हणजे जल प्रदूषण .                                                                                                             आज आपण घरगुती सांडपाण्याचे व्यावस्थापन योग्यप्रकारे केले जात नाही .त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते .सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणा सुस्थितीत नसल्यामुळे या प्रकिया व्यावस्थित केल्या जात नाहीत .अपुरे आणि मर्यादित ज्ञान यामुळे आपण सांडपाणी या वर काही प्रक्रिया करू शकत नाही .त्यामुळे सांडपाण्याचे बाष्पीभवन तरी होते किवा जमिनीत मुरून जाते .काही ठिकाणी सांडपाणी डबकी तयार होतात .आणि अनेक प्रकारच्या रोगांना कारणीभूत ठरतात .                                                                                                   भूगर्भातील जल साठ्यांचे  सांडपाण्यामुळे प्रदूषण होते .सतत येणाऱ्या पुरामुळे पाणथळ जागा नष्ट होतात .आणि घन कचरा मोठ्याप्रमाणात पाण्यात मिसळतो .याशिवाय अनेक ठिकाणी नाले ,नद्या यांच्या  पात्रात कचरा फेकला जातो .घरातील आताचे पाणी हे खूप घटक रसायने घेऊन बाहेर पडते जसे कि साबण ,शाम्पू ,ओईल , बराच काही आता आपण हे नदी नाल्यात सोडत असतो .                                                                                                                           आज देशाच्या सर्वच भागात नद्या आणि  तलावांच्या काठावर अनेक कारखाने उभे आहेत .शिवाय शेतेही आहेत .शेतामध्ये वापरले जाणारे  किड नाशके आणि खते यांच्यातील रसायने आज नद्या च्या पाण्यात आढळली आहेत .नद्यांच्या पाण्यात अंघोळ करणे ,कपडे धुणे भांडी घासणे याच बरोबर सकाळचा विधी करणे .या गोष्टी मुळे आज मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होते आहे . जल शुद्धीकरण करणे खूप खर्चिक बाब असल्याने सर लोकांना करता येईल एवडे सोपे नाही त्यामुळे आज या सर्वातून साथीचे व  रोग रोग पसरतात . त्यामुळे जल प्रदूषण कमी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे हे .जर असेच राहिले तर आपल्याला पाणी पिण्यासाठी  मिळणार नाही .                                                                                           १० वर्ष पूर्वी  गावातील  नदी  नाल्यातील सुद्धा पाणी  पिण्यासाठी  वापरले जात होते .मात्र आता ती परिश्तिती राहिली नाही .आधी सारखे नदी नाल्यातील पाणी हे पिण्या योग्य राहिले नाही .आज  त्या नदी  नाल्यात आपण केलेली घाण आपण टाकत आहे .त्यामुळे ते नदी नाले आता पूर्वी सारखे पाणी शुद्ध देऊ शकत  नाहीत .आज प्रत्येक गावातील नदी ओढे  नाले  हे गावातील सांडपाणी ,कचरा , प्लास्टिक मानवी मलमूत्र  यांनी आणि  मृत प्राणी यांनी हे नदी नाले दुषित झाले आहेत .आज गावातील महिला नदीत सांडपाणी बरोबर  भांडी धून या मुळे नदीत धूत असल्याने पाणी दुषित होत आहे . तसेच जनावरे मूत झाली कि ते नदीत आणून टाकली जातात .त्यामुळे तेथील पाणी दुषित होत आहे .                                                                           तसेच आज प्रत्येक शेतात खत ,तणनाशक ,कीडनाशक ,औषध  फवारली जातात . शेतातील ते रसायने पाणी पावसा सोबत नदी नाल्यात येतें त्यामुळे पाणी प्रदूषित होत आहे .तसेच आज  आपण स्वच्छ भारत अभियान  मध्ये  बांधलेले स्वचालाय याचे पाणी सुद्धा नदी नाल्यात सोडल्याने पाणी दुषित झाले आहे .                                                                    तसेच आज सर्वात जास्त  लोक हे देव धर्माच्या नावाखाली  पूजा पूजेच साहित्य  धार्मिक विधी हे केल्या नंतर  सर्व नदी तलाव किवा विहरी मध्ये टाकतात त्यामध्ये  राख ओईल .असल्याने ते पाण्यावर तरंगून पाणी प्रदूषित करतेच सोबत पाण्यात असलेले सजीव यांना मारण्याचे काम करत असते . तसेच  काही मूर्ख  लोक स्वताच्या फायद्या साठी पाण्यात विषारी औषधे  टाकून पाणी दुषित करत असतात . वरील पैकी कोणीही हि एक कृती केली नाहीतर  हे होणार प्रदूषण होणार नाही . करा प्रयत्न  होईल .





गुरुवार, ७ जुलै, २०२२

जमिनीचे प्रदूषण !

जमिनीचे  प्रदूषण ,
                          आज आपण जमिनीचे प्रदूषण का असे कोण कशामुळे झाले यावर प्रकाश टाकणार आहोत ,जमिनीचे प्रदूषण होण्या मागे दोन गोष्टी आहेत .ते म्हणजे नैसर्गिक आणि मानव निर्मित या मध्ये आपण दोन्ही   पाहणार आहोत .                                                                                                                                                      वृक्ष तोड पूर वार्यामुळे जमिनीची धूप होते .पुराचे पाणी शेतात साचून राहते .रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्यामुळे जमिनीतील आम्लता आणि क्षाराचे प्रमाण वाढते .यामुळे भारतातील सुमारे ४५ टक्के शेतजमिनी निकृष्ट बनली आहे .जंगल तोड अशाश्वत शेती खाणकाम आणि भूगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा हि यामागची मुख्य करणे आहेत .कारखान्यातून सोडली जाणारे रासायनिक सांडपाणी ,वैधकिय व इतर कचरा घरगुती सांडपाणी इ .मुळे जमिनीचे प्रदूषण होते .एकून सुमारे १४७ दश लक्ष हेक्टर जमीन निकृष्ट बनली आहे .या सर्वामुळे अन्न आणि पर्यावरणाचा दर्जा घसरत चला आहे.                                                                                              आज एक नवीन समस्या जानिनीच्या प्रदूषणाला कारणीभूत आहे असे म्हटले तरी चालेल ती म्हाणजे वाढती लोकसंख्या या मुळे शहरे गावे वाढली रस्ते इमारती  वाढली मानवाच्या अवास्तव प्रधेमुळे जमिनीची  गुणवत आणि महत्व कमी होत गेल .मानव आपल्या फायद्या साठी जानिनीचा हवा तसा वापर करू घेत आहे .त्यामुळे आज शेहरा जवळील  जमिनी ह्या नापिक  बनल्या  त्या ठिकाणी शहरातील संड पाणी अतिक्रमण  कचरा . वाढते  शहरीकरण या सर्वांचा जमिनीवर परिणाम म्हणजे जमिनी नापीक अशा प्रकारे जानिनीचे प्रदूषण वाढले आहे .तशेच आज आपण पाहत आहोत कि या वेळेला सर्व भारत भर जे रस्ते इमारती  नवीन बांधकामे केली जात आहेत .त्यामुळे झाडे  खूप तोडली जात आहेत तसेच त्यामुळे आज जमीनीच  खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होताना दिसत आहे .                                                                                                         आज एक  १०० किमी रस्ता बांधला असेल तर अंदाजे  १० लाख झाडे तोडली  गेली ,जेवडी झाडे तोडली गेली त्याच्या  पाच पट तरी झाडे लावली गेली पाहिजेत होती मात्र आज तास झालेलं दिसत नाही . तसेच प्रत्येक शहरात आज वाढलेलं शहरीकरण आणि कॉक्रीटी करण यामुळे शेहरात जमिनी शिल्लक राहिल्या नाहीत .तसेच लोकांच्या वाढत्या  गरजा  मुळे माणूस त्याला पाहिजेत तसे जमिनीचा वापर करत आहे .त्यामुळे जमीनीच प्रदूषण वाढत आहे .वाढती लोकसंख्या सर्वात जास्त जमिनी ला  वापर वाढवून प्रदूषण करत आहेत .












thanks to .....

सोमवार, ४ जुलै, २०२२

झाडे त्यांची उपयुक्तता

Mango tree

नमस्कार ,

                             आज आपण या पेज वर आपल्या गावात परिसरात असलेलेया झाडण बदल त्यांच्या उपयुक्ते बदल या ब्लोग मध्ये माहिती करून घेणार आहोत 


आपले गाव ,गावाचे वातावरण ,तिथले पर्जन्यमान ,आपला उदेश आणि आपली गरज ओळखून झाडे लावली तर त्यांची उपयुक्तता आणखी वाढेल .त्यानुसार आपण  कोणती कोठे झाडे लावावीत ते पाहूया ..

#प्रदूषण नियंत्रणासाठी म्हणजे वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण वाढवण्यासाठी लावायची झाडे .--पिंपळ, अमलतास ,सेलम ,कदंब,गुलमोहर ,बाम्बुसा,वल्ग्यारीस.तुळस वड.

#वातावरणातील प्रदूषित कण शोषून घेणारी झाडे .--उंबर ,पळस ,सीताफळ ,जांभूळ ,सप्तपर्णी ,आवळा ,चिंच ,मोह ,बेल ,कडूनिंब ,पुंत्र्जीवा ,तेंदू ,आंबा ,चारोळी,अमलतास ,जारूळ, लेन्दिया ,अशोक ,सेनल ,गुग्गळ..

वातावरणात सुगंध पसरून हवेतील प्रदूषण थांबण्यासाठी .---बेल,अमलतास ,लेमनग्रास ,बांबू ,सफेद कचनार ..

#सांडपाण्याच्या जागेत लावायची झाडे --चिंच ,बोर ,कार्दाडी ,जांभूळ ,साजड,अर्जुन ..

#शोभेसाठी  लावायची झाडे .--यामध्ये गुलमोहर,पळस ,कदंब ,कांचन ,अमलतास ,कॅशीया ,प्रजाती ,ज्याक्रांडा,नागचाफा ,सोनचाफा ,शंकासूर ,जारूळ,पेत्रोफोरम ,गलीरीसिडीया ,सेमल ,बॉटल ब्रश ,रेन ट्री,बकाण ,केशिया प्रजाती ,सिल्वर ओक ,सुरु ,निलगिरी ,अशोक ,चंदन ,महोगनी ,बदाम ,जंगली बदाम 

#गवताच्या प्रजाती --शेडा,मोठा ,मारवेल ,मुशी ,डोंगरी ,बेर ,धामणा ,ऱ्होडस ,हराळी,काळी ,कुसळी ,फुली ,फोकळ्या,फोराडी, परा ,घाण्या मारवेल ,

#शेताच्या बांधावर लावायची झाडे .--१कुंपणासाठी -एरंड ,मेंधी चिल्लर ,विलायती बाभूळ ,ग्लीरीसिडीया ..

 #धार्मिक स्थळाजवळ लावायची झाडे .--उंबर ,वड बेल  ,अर्जुन ,आंबा .आवळा ,कदंब ,कवठ ,कांचन ,कवठीचाफा ,पारिजात ,बकुळ ,बेल ,रुद्राक्ष ,सोनचाफा ,चंदन ,चिंच ,नारळ ,पांढरा चाफा ..

#गावाच्या रस्त्याच्या कडेला लावायची झाडे -गावात येणाऱ्या रस्त्याच्या दु तर्फा असलेल्या शेतांच्या बांधावर वड ,चिंच ,शिसू ,कडुलिंब ,आंबा ,निलगिरी ,करंज ,गुलमोहर ,बाभूळ ,अमलतास ,जांभूळ .हि झाडे रस्त्याने लावावीत त्यामुळे रस्त्याने सावली प्रदूषण  उष्णता ,ओक्शिजेन ,हिरवळ असे बरच फायदे आपल्याला रस्त्याने झाडे लावली  तर मिळतील.    कारण हि झाडे  प्रतिकूल परिस्थितीत वाढतात ,त्यामुळे आपण हि झाडे मिळेल तेथे लाऊ शकतो...


झाडे लावू  झाडे जगवू ! जीवन सफल सुखी बनवू !





वड


शुक्रवार, १ जुलै, २०२२

जमिनीच्या प्रकारानुसार लावावयाची झाडे ...


tree

या पेजे वर आज आपण माहित करून घेणार आहोत कि जमिनीचे प्रकरंज कार  आणि  त्यानुसार लावायची झाडे कोणते झाडे कोणत्या जमिनीत येतील वाढतील हे पाहणार आहोत 

जमिनीचा प्रकार                                                                                  * करड्या व काळ्या रंगाच्या विविध पोताच्या जमिनी  या जमिनीवर खालील प्रमाणे झाडे लावावी

@ झाडे सिरम ,कडूनिंब ,अंजन ,शिसू, सुबाभूळ ,करंज, बाभूळ ,आंबा, निलगिरी ,शेवगा इ

*मुरमाड दगडापासून तयार झालेली मध्यम खोल जमीन .

@सागवान, बांबू ,खेर,निलगिरी, सुबाभूळ ,शिसू ,सिरम, चिंच ,बाभूळ ,सीताफळ,आंबा. इ.

*चुनखडीयुक्त तपकीर व काळ्या रंगाची जमीन 

@सिसम,चिंच,बाभूळ ,सीताफळ,आंबा ,इ 

*रेताळ जमीन @खेर,  शिसू ,बकाण ,सिरस, करंज ,कडूनिंब ,इ 

*चिकन मातीची जमीन ...@हिवर ,बाभूळ,महारुख, सिरस ,जांभूळ ,अर्जुन ,करंज इ .

*शारयुक्त व आम्लयुक्त जमीन ..@सिरस ,करंज .अर्जुन ,निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ ,इ.

*तांबूस मातीची जमीन ..@ऑस्ट्रेलियन बाभूळ ,मोहा,बिजा ,सागवान ,अंजन ,सेमल ,कांचन, शिवन, काजू , इ  .*रुक्ष क्षेत्र  पडीक क्षेत्र ..@बाभूळ ,सिरस ,कडूनिंब ,शिसू ,निलगिरी ,सुरु ,आवळा ,बोर, कांचन, इ 

साधारण पाने आपल्या कडे पाऊस हा कमीत कमी २५० मिमी ते ५०० मिमी पडतो आणि जास्तीत जास्त १८०० मिमी पाऊस पडतो  या नुसार पावसाच्या अंदाज घेऊन झाडाची लागवड करावी तसेच जमिनीच्या खोली नुसार झाडे लागवड करावी जेणे करून झाडे चांगली वाढतील आणि फळे फुले येतील आणि या झाडांना झाडाच्या वयानुसार खोली करून खोल खड्यात झाडे लावावीत .त्यांना सेनखत गांडूळ खत  झाडे लावतानी आणि लागवडी नंतर द्यावीत .जेणेकरू वाढ चांगली होईल .तसेच लागवडीच्या वेळेस काही जमिनीत हानिकारक बुरशी असल्यास बुरशी नाशक लाऊन लागवड करावी .झाडे लावताना कमीत कमी ते एक वर्षाची झाडे लावावीत किवा बिया पासून झाडे लावायची असल्यास वर्षभर त्यांना पाणी खात द्यावे तशेच झाडाचे संरक्षण म्हणून त्याला तर काटेरी किवा झाडाची कुंपण करावे प्राणी त्याला इजा पोहचवणार नाहीत्र्ब याची काळजी घ्यावी 

वन हि जीवन दाता हेय ,जाने हर इन्सान,इनके बिन संभव नाही ,मानव का कल्याण !

मत कर ऐ इन्सान तू ,वृक्षो पार प्रहार ,जितने वृक्ष काटेगे  तू होगा ,उतना हि लाचार !

चाहते हो यदि जीवन बचाना,मत भुलो फिर वृक्ष लागणा !

  







तुळशी !

तुळशी
                                                                                                                                              तुळस  एक आयुर्वेदिक वनस्पती तुळस आहे .आज असा एक हि  व्यक्ती नाही कि ज्याला तुळस माहित नाही ,तुळस हि आपल्या जीवनाचा एक महत्वःचा भाग आहे .
हिंदू धर्मातील तुळशीचे महत्व 
हिंदू समाजात तुळशीला खूप मनाचे स्थान आहे .तुळस मंगलतेचे पवित्राचे  प्रतिक आहे .हिंदू घरामध्ये घरोघरी तुलसी वृंदावनात कुंडीत किवा दारी जमिनीवर तुळशीचे रोप लावले असतेच अनेक जन रोज तुळशीला सकाळ संध्याकाळ पूजा अर्चना करतात हिंदू स्त्रिया तुळशीला रोज प्रदिक्षणा घालतात तशेच वारकरी गळ्यात तुलसी माळ घालतात .हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृत्यू देहावर तुळशीचे पाने ठेवली  जातात 
तुळशीच्या जाती ..
*राम तुळस 
*काळी तुळस 
*कापूर तुळस 
*कृष्ण तुळस 
*लवंग तुळस 
*औषधी तुळस 
*रान तुळस  
साधारणतः तुळस आपल्या कडे सर्वत्र आढळून येणारी वनस्पती आहे ,हि वनस्पती माळरानावर झुडप आढळतात ते साधारणतः ३०ते १२० सेमी पर्यंत वाढतात तिचे पाने लंब गोलाकार कापलेली तसेच टोकदार असतात एकआड एक असतात तुळशीच्या तुरयासारख्या फुलाला मंजिरी म्हणतात .फुलामध्ये औषधी सुगुंधी  तेल असते फुला मध्ये तुळशीच्या बिया मिळतात  व तुळशीच्या पानामध्ये कीटक रोधक द्रव्य असल्याने कीटक त्यापासून दूर राहतात .तसेच वनस्पती शास्त्रज्ञ  यांच्या  म्हण्यानुसार तुळस हि दिवसाचे २० तास ओक्शिजेन देते आणि ४ तास कार्बनडाय ऑकसाइड हवेत  सोडतात .आधी आपल्या प्रत्येकाच्या दारी तुळस असायची मात्र आज शेहरसारखे ठिकाणी घरे ऐकावर  एक राहतात मात्र तेथे तुळस सोभाणार नाही म्हणून तुळस वाड्यात सोडून जातात तुळस कशासाठी म्हणून लावायची याच शास्त्रीय ज्ञान घेण्याची इच्छा सुशीशितांची नसते .म्हणून आज  त्यांना खूप दुर्धर आजारांना समोर जावे लागत आहे. सुदेइवाणे गावात हि परिश्तिती नसल्याने आपण गावकर्यांना आजार होऊनायेत या साठी वृक्षारोपण च औषध गावाला देऊ या .हवा शुद्ध करण्याची क्षमता तुळस या वनस्पतीत आहे ,त्यामुळेच तुळस  अंगणात असायचीच आपली आई ,आजी रोज पाणी घालून तिची काळजी घ्यायच्या .त्या बदल्यात सर्व कुटुंबा साठी हीच तुळस घरातील हवा शुद्ध  करायची .पण आजच्या  आई ला तुळशीला पाणी घालन कमीपणा मागासलेपणा  वाटतो .कारण तिच्या दृष्टीने तुळस हे शोभेचे झाड नाही ,तुळशीच्या गुणधर्म बदलाच ते अज्ञानी असते .त्यांनी तुळस नाही लावली त्याचे दुष्परिणाम आपण सर्वांनी कोविड १९  आला त्यावेळेस पहिले कारण सर्वात जास्त मृत्यू हे शेहरात झालेत त्याला कारण माहित असल  कि अशुद्ध हवा आताही वेळ गेली नाहीय चला परत गावोगावी तुळशीच्या बागा फुलवूया मिळेल त्या ठिकाणी रोपे लावून गावे शुद्ध करू या मग पह शेहरातील लोक कसे धावत गावाकडे येतील ते आपण कोविड १९ मध्ये पाहाल आहे .वेळ आहे आपण एकपावूल  पुढे येवून  आपल गाव कुटुंब यांना आरोग्य दायी सुखी समृद्धीची जीवन जगण्यासाठी मदत करण्याची . आपल्याला माहित असेल कि भारतातील सर्वात मोठे तुळशी बाग हि पंढरपूर येथे आहे तेथे वन विभागाच्या व  नगर परिषद  यांच्या संयुक्त विद्यमानाने  खूप सुंदर बाग तयार केली आहे .आज पंढरपूर वाशियांसाठी हि एक ओक्शिजन पार्क म्हणून काम करत आहे .आज आपल्याला माहित असेल कि एक ओक्शिजेन सिलेंडर ची किमत हि हजारो मध्ये आहे .मात्र काही विशिष्ट वेळेला ती लाखो मध्ये असते  म्हणून सांगतो परत हि वेळ येऊ देऊ नका ..
कटते रहेंगे अगर पेड तो ,एकदिन बरबादी आयेगी .हर तराफ फेईला रेगीस्तान ,देखकर दुनिया पछतायेगी ..

ग्रीन आर्मी ! हरित सेना

ग्रीन आर्मी  हरित सेना 

 लष्करात साजरा करण्यात येणाऱ्या आर्मी डे च्या धर्तीवर हरित सेना दिवस साजरा करणे .

हरित सेनेच्या जवानांनी या दिवशी वर्षेभर केलेल्या वृक्षारोपणाचा आढावा घेऊन कोणती झाडे जगवण्यासाठी काय केले पाहिजेत हे सांगावे 

पार्श्वभूमी

देशासाठी जीवन जीवन समर्पित करणारे .आणि, एकात्म ग्मारीन नवतावादी संकल्पना मांडणारे, पंडित दीनदयाळ उपाध्याय  यांचे निधन ११ फेब्रुवारी १९६८ या दिवसी झाले .अज्ञात  मारेकर्यांनी त्यांची हत्या केली ,पण त्यांच्या विचारांची हत्या करू शकले नाहीत .त्यामुळे अशा प्रेरणा दायी  व्यक्तिमत्वाचे जीवन आपल्याला हि हिरवाई वाढवण्याच्या कामी प्रेरणा देईल असा विश्वास वाटल्याने त्यांचा स्मुती दिन हा हरित सेना दिन म्हणून साजरा केला जातो 

संकल्पना 

आज कोट्यावधी सैनिकांची भारती असलेली हरित सेना ( ग्रीन आर्मी  ) राज्यभर तयार झाली आहे .ज्या प्रमाणे लष्करात दरवर्षी १५ जानेवारी हा आर्मी डे म्हणून साजरा केला जातो ,त्याच प्रमाणे ११ फेब्रुवारी हा ग्रीन आर्मी डे साजरा केला पाहिजेत  या दिवशी मागील वर्षी लावलेल्या व पुढील वर्षी लावायच्या वृक्ष लागवड बाबत चर्चा आखणी केली जाते /जावे 

हरितसेनेचे वार्षिक उपक्रम .....जागतिक स्तरावर वन वन्यजीव व पर्यावरण संबंधात दिनदर्शिका प्रमाणे साजरा करणे .प्लास्टिक पिशवीच वापर टाळण्यासाठी कापडी पिशवी बनविणे . उघड्यावर शौच करू नये .या विषयी प्रबोधन पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्या विषयक जनजागृती करणे . वृक्षारोपण संरक्षण करणे .

हरितसेना उदिष्टे ...*१ .वने हि माणसाला मिळालेली एक नैसर्गिक संपदा आहे .वनांचे पुनरुजीवन करणे शक्य आहे त्यासाठी आवश्यक आहे उत्तम वन व्यावस्थापन .*२ प्रत्येक नागरिकास वन व वन्यजीवांचे संरक्षण संवर्धन करण्याची संधी उपलब्ध करून देणे .*३ लोकसहभागातून वन वन्यजीव संवर्धन प्रभावी पने करणे .

हरितसेना सैनिकाची भूमिका ..वन विभागामार्फत आयोजित वृक्ष लागवड ,वृक्ष दिंडी वनाच्या संरक्षणा  करिता सामुहिक गस्त ..वणव्याच्या हंगामात प्रत्यक्ष सहभाग वन विभागामार्फात वनमहोत्सव कालावधीत व वन्य जीव सप्ताह संरक्षण उपक्रमा मध्ये सहभाग जनजागृती कार्यक्रमा मध्ये सहभाग ..

हरितसेने मध्ये कोण सहभाग घेऊ शकते ..१ *राज्यातील प्रत्येक नागरिक हरित सेनेचा सदस्य होऊ शकते .२ *सामुहिक संस्था स्वरुपात सुद्धा सदस्य नोंदणी करता येईल .

सदस्य कसे होता येईल ...हरितसेनेच्या सदस्यत्वांसाठी www.greenarmy.mahaforest.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर नोंदणी करावी .नोंदणी साठी आवश्यक दस्तावेज खालीलप्रमाणेकोणतेही एक ओळखपत्र-१ आधारकार्ड २ मतदान ओळखपत्र ३ ड्रायविंग लायसन्स. ४ शालेय /शाशकीय ओळखपत्र 

या मोहिमेमुळे जनतेला होणारा फायदा ...१ *जे स्वयंसेवक वर्षेभर सक्रिय सहभाग घेतील ,त्यांची शासनामार्फत विशेष दखलघेऊन त्यांना प्रमाणपत्र  किवा पारितोषिक देऊन पुरस्कृत केले जाणार आहे .२ *स्वयंसेवक यांना वन क्षेत्र अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्पात लागणाऱ्या प्रवेशात शुल्क यात व इतर शुल्कात सवलत देण्याची तरतूद शासनामार्फत विचाराधीन आहे ...

पेडो का एक एक हिस्सा, मानव के आता काम ,पेड धरती पर मनुष्य के ,लिए हेय एक वरदान ! 


महायज्ञ वृक्षारोपणाचा !

वृक्षरोपण

 वनी तीर्थी फिरून अला !आपला गाव नाही सुधारला !तो कैसा म्हणावा महाभला !एकटाचि !

गावानाही शहरसारखे करण्याचा स्थानिक मंडळीचा ध्यास चुकीचा नाही .सुधारणांच्या कालचक्राच्या फेऱ्यात न अडकता आपण भविष्यातील मोठ्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आतापासूनच तयारी करण्याची गरज आहे .  तर आपण सर्व मिळून हिरवाई वाढवण्यासाठी आपण या १ते ७ २०२२पर्यंत च्या लावण्याचा वृक्षारोपण महायज्ञ  वृक्षारोपणाचा !आम्ही  सुरु केला आहे त्यात गावांनी लोकांनी वृक्षारोपण करून समिधा अर्पण केल्यावर याची पूर्णाहुती होणार आहे .

गावे उजाड का झाली ..

गावे उजाड ओसाड होताना ,गावातील पाण्याचा स्त्रोत आटून जाताना आपण गावाचे भूमिपुत्र म्हणून त्याबद्दल आपापल्याच त्याचे गांभीर्य वाटत नाही ,जर का आपण गावाबद्दल गंभीर असतो तर मला आज आपल्याकडे झाडे लावण्याबद्दल सांगायची वेळच आली नसती .गावातील पाणी आटले,शेतातील उत्पन्न कमी झाले ,डोंगर बोडखे झाले ,माळरान उजाड झाले आणि आपण हे उघड्या डोळ्यांनी बघण्याशिवाय काहीच केल नाही आपल्या गावातील अनेक जण दरवषी पंढरपूर, तुळजापूर ,कोलाह्पूर, शिर्डी ,शेगाव ,माहूर ,बारा जोतिर्लिंग  साडेतीन शक्तीपीठअशा ठिकाणी दरवर्षी देवदर्शनासाठी यात्रा करतात जत्र यात्राना जातात .पण त्यांना गावाबद्दल काहीच वाटत नाही आणि ते गावासाठी काहीच करत नाहीत ,अशा लोकांबद्दल तुकोडोजी महाराजांच्या च  शब्दात सांगायचे झाले तर 

 वनी तीर्थी फिरून अला !आपला गाव नाही सुधारला !तो कैसा म्हणावा महाभला !एकटाचि !

जो अनेक तीर्थ यात्रा करून ,देवदर्शन करून पुण्य मिळवून आला.आपण मिळवलेले नुसते पुण्य गावावरचेसंकट दूर करू शकत नाही .त्यामुळे गावाला त्याचा काहीच उपयोग नाही !देवदर्शनाचे पुण्य पदरी घेताना जर त्याने आपला गावच सुधारला नाही तर केवळ देवदर्शनाने त्याला भलामाणूस  म्हणजे पुण्यवान कसं म्हणता येईल ? असा तुकोडोजी महाराजांचा करडा सवाल आपल्या सर्वाना आहे .
 चला या निमिताने गावात देवराई पुन्हा फुलवू ..





ज्येष्ठ पौर्णिमा ! वटपौर्णिमा !

पूजेसाठी तरी 

           वृक्षारोपण करू या ..वटपोर्णिमा


हा सण आता केवळ महिलावार्गापुरता राहिला नाही .या दिवशी पुरुषांनीही वाडाच्या झाडाचे पूजन नवी झाडे लावून साजरे करावे .

प्रत्येक पुरुषांने आपल्या पत्नीसाठी एक झाड लावावे .आणि त्यांचे  वर्षेभर संवर्धन करावे .

पार्श्वभूमी 

             सावित्रीने वडाच्या झाडाखाली यमाकडून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत मिळवले  तो दिवस म्हणजे जेष्ठ शुद पोर्णिमेचा दिवस .या दिवसी महिला भगिनी वडाची पूजा करून पतीच्या दिर्घयुष्यासाठी प्रार्थना करतात .हे झाल पौराणिक व पारंपारिक सार .पण पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून आपल्याला पुढच्या पिढीसाठी त्याचे संवर्धन करण्यासाठी सावित्री बरोबरच सत्यावानानीही  वडाची पूजा करण्याची वेळ आली आहे .या         सणाच्या निमिताने काही प्रश्नाची उतरे मिळवण्याचा प्रयत्न गावांनी करावा .

संकल्पना 

                   सहजपणे कुठेही दिसणारे झाड अशी वडाच्या झाडाची प्रसिदी होती.मात्र आता वडाची झाडे तोडली गेली आहेत .हि वस्तूस्थिती आहे .रस्ते विकासाच्या आड  येणाऱ्या झाडामध्ये वडाच्या झाडाचा नंबर सर्वात वर लागतो .पर्यावरण संवर्धनात  वडाच्या झाडाची भूमिका महत्वाची असल्याने आपण वडाच्या झाडांची पुन्हा   एकदा गावात लागवड करणे आवश्यक झाले आहे .वडाच्या झाडा बरोबरच पिंपळ चिंच कडूनिंब अशी जमिनीची धूप थांबवणारी सावली देणारी दीर्घायुषी देशी झाडांची गावातील संख्या वाढवणे गरजेचे झाले आहे .                                             अधिक माहिती           आपण वट पौर्णिमेच्या दिवसी वडाची पूजा करताना महिलांना बघतो .पण या दिवसी वडाची पूजा का केलीवटवृक्ष जाते .वादाच्या झाडाचे महत्व काय याची माहिती अनेकांना नाही .वटवृक्षचे  आयुस्ष्य मोठे असते .आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना ते सावली देण्याचे काम करते .वाडाच्या झाडाच्या पारंब्या या फांद्यावरून पुन्हा जमिनीत शिरतात आणि दुसरे झाड मूळ धरू लागते .त्यामुळे वडाच्या झाडाला अक्षय्यवृक्ष  असेही संबोधतात .या झाडाचे आयुष्मान भरपूर असल्याने ते आपल्या अनेक पुढच्या पिढ्यांना सावली देते .वडाच्याझाडाचे मूळ पाण्याच्या दिशेने दूर पर्यंत वाढत जात असल्याने जमिनीची धूप थांबवते एक झाड सुमारे ५०० ग्यालन वाफ बाहेर सोडत असल्याने येण उन्हाळा त या झाडाखाली थंडावा असतो .वडाच्या झाडाला वर्षेभर फळे लागतात हि फळे अनेक पक्षी प्राणी यांचे अन्न आहे .

गुरुवार, ३० जून, २०२२

१ ते ७ जुलै वन महोत्सव ( वन सप्ताह )

  जागवा अपुले अंतर्मन !जगण्यासाठी हवे वनसंवर्धन !


         *वन संरक्षण आणि वनसंवर्धनाचे महत्व पटवणारा सप्ताह .

         *प्रत्येकाने  एक तरी झाड लावावे आणि सांभाळावे हि अपेक्षा .

   पार्श्वभूमी

              भारतीय संस्कृतीमध्ये  माणूस आणि जंगल यामधील द्रुढ नाते नाना प्रकारे सांगितले गेले आहे.परंतु गेल्या काही दशकात आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे .हि जाणीव व्हावी आणि हि परिश्तिती सुधारण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडून केला जावा यासाठी वन महोत्सवामधून प्रोत्साहनदिले जाते .

मूळ संकल्पना व सुरुवात 

       भारतात १९५० साली के. एम .मुन्शी यांच्या  पुढाकाराने  वनमहोत्सव सुरु झाला .ते त्यावेळी केंद्र सरकारमध्ये अन्न आणि कृषी मंत्री होते .

त्यावेळी भारतात जंगल क्षेत्र भरपूर होते परंतु कदाचित पुढील गरजा आणि धोका ओळखून ,जंगलाच्या संरक्षणासाठी, त्यांनी वनमहोत्सवाला चालना दिली .कारण शहरीकरण आणि औधोगीकरण हवे असेल तर वाटेतली झाडे तोडली पाहिजेत असे ( चुकीचे  ) समीकरण मूळ धरू लागले होते .

 

महत्वआणि गरज 

      खरे तर जंगलापासून फक्त मानवालाच नाही ;तर संपुर्णसजीव -निर्जीव सृष्टीला अनेक फायदे होतात .हवामानाचे संतुलन ,नियमित पाऊस,शुद्धहवा वळवण्टीकरणापासून उद्भवणाऱ्या समस्या दूर करणे ,पशुपाक्षानायोग्य अधिवास देणे  ( राहण्याची जागा  )जमिनीची धूप तसेच पाण्याचे आक्रमण थोपवणे  हे फायदे तर होतातच शिवाय आपल्याला लाकूड आणि इतर वन संपती मिळते ती वेगळीच !  पण आपली चूक इथेच होत आहे .माणसाच्या हावरटपणामुळे तात्पुरत्या फायद्यासाठी  मनुष्य जंगलाची तोड  करत  चाललो आहोत .

 आपण काय करावे .

 *वर्षाच्या सुरवातीपासून केलेल्या वृक्षरोपणाचा आढावा घ्यावा .

  *या सप्ताहात गावातील शेतांच्या बांधावर झाडे  प्रत्येकाने पुढाकार घ्यावा .

  *गावाच्या देवस्थानासाठी देवराई सारखा प्रकल्प तयार करून त्याला              गावातील प्रत्येक वेक्तीने सहभाग घेऊन झाडे लावण्यास मदत करावी .

  *या सप्ताहात गावकऱ्यांनी कोण कोणती झाडे कशा पद्धतीने लावावीत          याबद्दल एक मेकांना मार्गदर्शन करावे .

  *झाडे लावण्यासाठी रोपे उपलब्ध करून द्यावीत .

   *या निमिताने गावाच्या परिसरातील स्थानिक झाडाची माहिती संकलित                    करावी . 

   *गावात कुऱ्हाड बंदिसारखा निर्णय करता येईल का यावर                              चर्चा,विचारविनिमय  करावा .

जड -पत्तो से औषधी ,पुष्पो से स्वागत -सन्मान ,

पेडो का हर एक हिस्सा, आता हेए  मनुष्य के काम !

बुधवार, २९ जून, २०२२

पर्यावरणाचे राजदूत !

!  पर्यावरणाचे राजदूत !



आज आपण या पेज वर  पर्यावरणाचे  राजदूत कोण आहेत आणि त्यांचा पर्यावरणाशी  कसा कोणता  आणि काय  संबध या विषयी  माहिती घेणार आहोत .आपण यांना राजदूत का मानतो  आणि ते का त्यांचे आजचे महत्व काय . आणि त्यांची ओळख या ब्लोग मार्फत  करून घेणार आहोत .हे सर्व  सजीव जीव रोज आपण पाहतो  आणि त्यांच्या सोबत आपला रोज सहवास  लाभतो .चला तर त्यांची ओळख करूया ...

राज्यप्राणी : शेकरू 



      शेकरू हि खारीची एक  प्रजाती  असून  महारास्त्रामध्ये  ती प्रामुख्याने भीमाशंकर ,वासोटा ,माहुली व फणसाडच्या डोंगरात आढळते .फळे आणि मधुरस हे त्याचे खाद्य आहे .त्याचे  शास्त्रीय नाव रटूफा इंडीका असे असून  इंग्लिशमध्ये याला  इंडियन जायंट स्कीरल असे  म्हणतात .


राज्यपक्षी : हरोळी



हरियाल किवा  हरोळी हा पक्षी कबूतराच्या वंशातील  आहे .याचे  शास्त्रीय नाव ट्रेरोन फोनिकॉप्टेरा असे असून त्याला  इंग्लिशमध्ये यलो फुटेड ग्रीन पिजन  म्हणतात .मराठीत याला हिरव्या रंगाचे कबुतर असेही म्हणतात .हा पक्षी आपणास गावातील पडीक घरे जुने वाडे वाडचे झाड किवा टेलेफोन तर मंदिरे येथे पहावयास मिळतात .


राज्यफळ: आंबा 



आंबा हे महाराष्ट्र राज्याचे वैशिष्टे पूर्ण  फळ असून  हापूस जातीच्या आंब्याची  जगभरात निर्यात केली जाते भारताचे हे राष्ट्रीय फळ आहे आणि भारत हा आंबा उत्पादनात जगात १ नंबर आहे . आणि भारतीय आंब्यांना  जगात खूप  मागणी आहे . कोकणातील आंब्यांना विशेष मागणी आहे .


राज्यफुल: जारुळ



      हे  फूल जारुळ बोंद्रा किंवा बुन्द्रा या नावाने  ओळखले जाते .त्याचा रंग लालसर जांभळा असतो .फेब्रुवारी -मार्च महिन्यात या झाडाला बहर येतो आणि एप्रिल ते जून या काळामध्ये हि फुले फुलतात .भरपूर पाणी मिळणाऱ्या ठिकाणी हे झाड वाढते.ल्यागरस्त्रोमिया असे याचे  शास्त्रीय नाव आहे .


राज्य फुलपाखरू : ब्लुयू मॉरमॉन



   सर्वात मोठ्या आकाराचे सर्दन बर्डविंग हे फुलपाखरू दक्षिण भारतात आढळते .या फुलपाखराच्या खालोखाल महाराष्ट्र मध्ये दिसणाऱ्या या फुलपाखराचा आकार मोठा आहे , पावसाळ्यात कमी पावसाच्या प्रदेशात हे फुलपाखरू स्थलांतर करते .ते मखमली रंगाचे असून त्याच्या पंखावर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात .श्रीलंका ,भारतातील पश्चिम घाट,दक्षिण भारत आणि पूर्व समुद्र किनारपट्टीवर हे फुलपाखरू आढळते .त्याला निलपरी असे म्हंटले जाते .खाण्याचे लिंबू  ,माकड लिंबू ,मेनका अशा वूक्षच्या पानावर या फुलपाखराची मादी अंडी घालते .अंड्यातून ठराविक दिवसांनी अळी बाहेर पडते .पाने खाऊन हि अळी मोठी होते .आणि तिचे फुलपाखरात रुपांतर  होते .राज्य फुलपाखरू जाहीर करणारे महाराष्ट्र हे  पहिलेच राज्य आहे .    

या प्रमाणे वरील राजदूत आपणास दिसले तर त्यांना अन्न आणि पाणी  दया आणि त्यांचे  रक्षण  करा .








८ जून जागतिक महासागर दिन

 सागरा  (चा ) प्राण तळमळला ..


       आजची महासागराची  काय अवस्था  हे आपल्याल्या सांगायची झाली तर जवळ जवळ 

* पृथ्वीचा ७५ टक्के हिसा व्यापणाऱ्या महासागराणा  पर्यावरणात महत्वाचे स्थान आहे .

*हजारो जलचरांचे  अधिवास  तर कोट्यावधी  मानवांचे अन्नदाते म्हणजे  महासागर '

*माणसाने केलेला कचरा  आणि प्रदूषण  याचा फटका महासागराना बसला आहे . 

*मानवाचे पाप धुण्याचे काम आजवर हा महासागर करत आहे .

महासागर हे कितीही  विशाल असले  तरी माणसाने केलेली किती  कचरा त्यांनी पोटात घ्यावा यालाही अखेर मर्यादा आहे .आपण हि मर्यादा ओलांडल्यामुळे तेथील जीवसृष्टीला आणि अन्नासाखाल्याना  धक्का बसला आहे .यामुळे माणसाला मिळणारे  मासे तर कमी झाल्रे  आहेतच ; शिवाय हवामानावरही विपरीत परिणाम होत आहे .

मूळ संकल्पना व सुरवात 

समुद्र दुषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे या संदर्भातला प्रस्ताव १९९२ मध्ये  कॅनडा ने   ,ब्राझिलमध्ये झालेल्या वसुंधरा शिखर परिषेदेत मांडला .त्या;ला सयुक्त राष्ट्र  संघाने २००८ मध्ये मान्यता दिली .तेव्हा पासून ' द ओशन  प्रोजेक्ट ' या अमेरिकन  संस्थेच्या  सहक्र्याने  हा दिवस अंतर राष्ट्रीय  पातळीवर साजरा होऊ लागला . 

गैर समाज !   

सांडपाणी ,औधोगिक प्रदूषके  ,मुदत संपलेली  व घटक रसायने ,प्लास्टिक च्या बाटल्या .नि पिशव्या ...कचरा  कोणताही  असो ---'' फेका  समुद्रात  ! अहो कोवढआ मोठा आणि खोल  समुद्र , एवढ्याश्या  कचर्याने  काय होतय  .हि प्रथा जगभरातील  बहुतेक सर्वानीच पाळ ल्यामुळे आता मात्र परीशिती  गंभीर बनली आहे .मासे मिळवण्या साठी अधिकाधिक खोल समुदरात जावे  लागत आहे .पाण्याचा दर्जा घसरला आहे .हवामानावर  परिणाम होत आहे ,विशिष्ट  सजीव नष्ट होत आहेत ........

आपण काय  करावे  

*या दिवसी  मुलांना समुद्र काठी सहल घडवून आणल्यास चांगले .किवा  वर्षातून एकदा तरी समुद्राचे दर्शन होईल     असा कार्यक्रम आयोजित करावा .

*पृथ्वीचा ७५ टक्के  भाग पाण्याने म्हणजेच महासागराणी कसा व्यापला आहे हे मुलांना  इतरांना सांगून त्याबद्लची  अधिक माहिती देण्यात यावी .

*समुद्रात असलेल्या सजीवांची माहिती सर्वाना करून देणे .

*या सजीवांच्या  सरक्षाना  साठी समुद्र ,कचरा  व प्रदुषणं पासून लांब ठेवण्याची गरज काय याची माहिती  द्यावी .

*किनारपट्टीवरील  गावांनी आपापल्या गावाला असलेल्या समुद्र किनार्याची काळजी घेणे  तेथे  कचरा ,व प्रदूषण होणार नाही  या बदल येणाऱ्या पर्यटकांच्या जागुती करणे  काळजी घ्यावी .

*गावच्या किनारपटइ चे संरक्षण करण्याची जबाबदारी गावांनी स्वीकारणे .

जल हि जीवन हे !

*








Featured post

चिकुनगुनियामुळे होणारी गंभीर लक्षणे ,

  चिकनगुनिया हा आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील डासांद्वारे मानवांमध्ये पसरणारा रोग आहे; इतर क्षेत्रांमध्ये तुरळक उद्रेक नोंदवले गेले आहेत. डे...